नाशिक

सातपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचे छापा : ५० जण ताब्यात

CD
सातपूरला जुगारअड्ड्यावर पोलिसांचा छापा पन्नास जण ताब्यात; १५ लाखाची रोकड जप्त सातपूर, ता. ६ : अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला असून, सातपूर परिसरातील बजरंगनगर येथील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेला जुगारअड्डा गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने उद्ध्वस्त केला. शनिवारी (ता. ५) केलेल्या या कारवाईत तब्बल ५० जणांना ताब्यात घेण्यात आले असून, १५ लाखाच्या रोकडीसह एकूण ८६ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. बजरंगनगर परिसरातील शेतात पत्र्याच्या शेडमध्ये क्लबच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला शनिवारी दुपारी मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चार पथके तयार करून एमआयडीसी अंबड पोलिसांची मदत घेत शेडच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर एकाच वेळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेर तैनात असलेल्या पोलिसांच्या पथकाने त्यांना जागेवरच पकडले. या कारवाईत क्लबचालक सचिन गांगुर्डे व अनिल शेजवळ यांच्यासह १२ जुगार कामगारांना ताब्यात घेण्यात आले. तसेच जगन लबडे, सोपान मेरे, वामन चुंबळे, उत्तम मंडलिक, निवृत्ती पिंगळे, संजय वराडे, बिपिन सिन्हा, शरद नागरे, भानुदास बिन्नर आणि नेताजी राजवंशी यांच्यासह एकूण ३५ जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सचिन गांगुर्डे आणि अनिल शेजवळ यांची या क्लबमध्ये भागीदारी असल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान जुगारासाठी वापरलेले साहित्य, रोकड आणि इतर साहित्य असा एकूण ८६ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईमुळे सातपूर परिसरातील अवैध जुगार व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप पवार पुढील तपास करीत आहेत. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Building Collapse : दिल्लीत पाच मजली इमारत कोसळली, ५० विद्यार्थी ढिगाऱ्याखाली, बचावकार्य सुरु...

Dream Astrology: रात्री झोपेत साप चावणे, पडणे किंवा दात पडणे... अशी स्वप्नं पडतायत? स्वप्नशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचे नेमके संकेत काय

प्रत्यक्षात अंतर ७४ किमी, फलकावर १३६; NHAIचा अजब कारभार, चुकीच्या आकड्यांनी प्रवाशांचा गोंधळ

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी भाजप आमदाराला अडवलं, नेमकं काय घडलं?

Pune Ganeshotsav DJ Ban : पुण्यात डीजेवर बंदी येणार? गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाद आणखी चिघळला; पोलिस उपायुक्तांनी केला खुलासा

SCROLL FOR NEXT