नाशिक

कचरा, दूषित पाणी ,ड्रेनेज समस्या प्रश्नी नगरसेवक आक्रमक : कामे न करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवण्याची मागणी

CD
पान तीन -------------------- 10608 सातपूर : प्रभाग समिती बैठकीत प्रश्‍न मांडताना नगरसेवक. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नगरसेवक आक्रमक सातपुर प्रभाग समिती बैठकीत अधिकाऱ्यांना खुर्ची खाली करण्याचा इशारा सकाळ वृत्तसेवा सातपूर, ता. २१ : परिसरातील पाणी, ड्रेनेज, रस्ते, अतिक्रमण, मोकाट कुत्रे-गाई आणि प्रशासनाचा भोंगळ कारभार या प्रश्नांवरून सातपूर प्रभाग समितीची बैठक चांगलीच गाजली. जर नागरिकांच्या समस्या सोडवता येत नसतील, तर अधिकाऱ्यांनी खुर्ची खाली करावी, अशी संतप्त मागणी नगरसेवकांनी केली. प्रभाग सभापती समाधान देवरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.२१) सकाळी झालेल्या प्रभाग सभेत सुरुवातीपासूनच लोकप्रतिनिधींनी नागरी समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाला धारेवर धरले. नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी मोकाट कुत्र्यांच्या समस्येवरून प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला. ड्रेनेज लाइन फुटल्याने नागरिकांच्या घरांसमोर सांडपाणी साचून दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. ही समस्या तातडीने सोडविल्या नाहीत तर अधिकाऱ्यांना उचलून ड्रेनेजच्या पाण्यात बुडवू, गुन्हा दाखल झाला तरी चालेल, असा इशारा इंगोले यांनी दिला. नगरसेविका सविता काळे यांनी प्रभागातील गढूळ पाण्याचा प्रश्न मांडला. यावर पाणीपुरवठा अधिकारी सूर्यकर यांनी गढूळ नाही, तर दूषित पाणी येत असल्याचे मान्य केले. नगरसेविका संगीता घोटेकर यांनी मोकाट कुत्र्यांच्या झुंडी वाढल्याचे सांगत वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप केला. बैठकी सर्व समस्या जाणून घेतल्यावर सभापती समाधान देवरे यांनी सर्व समस्यांची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामकाजात सुधारणा करून प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सदस्यपदी इंदुबाई नागरे आणि भारती धिवरे यांची निवड करण्यात आली. बैठकीला विश्वास नागरे, नितीन निगळ, अंकिता शिंदे, माधुरी बोलकर, नयना जाधव, सविता काळे, मनासी शेवरे, विभागीय अधिकारी सुनील राजभोज यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ------- अतिक्रमण आणि अनधिकृत प्रकल्पांचा मुद्दा नगरसेविका उषा बेडकुळे यांनी रो-हाऊस बांधकामामुळे नियोजित ९ मीटरचा रस्ता अतिक्रमणामुळे ७ मीटरवर आल्याचा मुद्दा उपस्थित करत नगररचना विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच गंगापूर रोडवरील बेडकुळे मळा परिसरात खासगी बिल्डरकडून अनधिकृत आरएमएस प्रकल्प सुरू असून, त्यातून प्रदूषण होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT