नाशिक

मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय बैठकीत प्रदीप पाटील यांचा सन्मान

CD
SGR26B07451 तुळजापूर : प्रदीप पाटील व सुनीता पाटील यांचा सत्कार करताना मान्यवर. ------- प्रदीप पाटील यांचा तुळजापूरला सन्मान सोनगीर, ता. ४ : सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारितेसह मराठा सेवा संघाच्या संघटनात्मक विस्तार आदी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत मराठा सेवा संघाचे वधू- वर सूचक व सामुदायिक विवाह कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप नथ्थू पाटील (घोडगाव) व त्यांच्या सौभाग्यवती सुनीता पाटील यांचा तुळजापूर येथे मंगळवारी (ता. १) सपत्नीक सन्मान करण्यात आला. मराठा सेवा संघाच्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ व पुस्तकांचा संच देऊन गौरविण्यात आले. या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यात देशातील २३ राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, विविध राष्ट्रीय कक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते. धाराशिवचे निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, सामाजिक कार्यकर्ते सज्जनराव साळुंखे, धाराशिवच्या पोलिस अधीक्षक रितु खोखर, प्रा. डॉ. सोपानराव क्षीरसागर, सुनील महाजन, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. संजय पाटील, राष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे अध्यक्ष निर्मला पाटील, उद्योजक कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. आर. एस. पाटील, राष्ट्रीय महासचिव डॉ. सोपान शिरसागर आदी उपस्थित होते. या वेळी राज्यनिहाय कार्य अहवाल सादर करून संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात आला. आगामी काळातील संघटनात्मक विस्तार आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या कृती आराखड्यावरही चर्चा झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Industrial Estate : सैनिक टाकळीत 'गायरान' जमिनीची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी; प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला विरोध कायम, उदय सामंतांनी काय दिलं आश्वासन?

धनंजय-पार्वती चढले बोहल्यावर! ‘अशी ही बनवाबनवी’चा AI VIDEO पाहून हसू अवरेना, तुम्ही पाहिलात का?

Crime: अग्रिपाड्यात दुहेरी हत्याकांड! १९ वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या, नंतर स्वतःलाही संपवलं; धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : धुळ्यात एसटी बसचा भीषण अपघात, ट्रकची जोरदार धडक, ४५ विद्यार्थी जखमी, ६ जणांची प्रकृती गंभीर

Nagpur Hotel Universe Case: हॉटेल युनिव्हर्समध्ये देहव्यवसाय, मालकाला अटक

SCROLL FOR NEXT