नाशिक

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे बचावले

CD
बिबट्याच्या हल्ल्यात दोघे बचावले सोनगीर, ता. ७ : सोंडले (ता. शिंदखेडा) येथील दोन भावांवर अचानक आलेल्या बिबट्याने हल्ला केला. मात्र, त्यांनी चतुराईने स्वतःचा बचाव करून घेतल्याने अनर्थ टळला. हे दोन्ही भाऊ रविवारी (ता. ७) रात्री शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. या पार्श्वभूमीवर सोंडले शिवारातील शेतकऱ्यांनी महावितरण कंपनीच्या धुळ्याच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिलेे असून, त्यात रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली आहे. सोंडले येथील रामा सोमा ठेलारी आणि सतीश सोमा ठेलारी हे दोघे भाऊ शेतात रात्री पिकांना पाणी देण्यासाठी दुचाकीने जात असताना, शेताच्या बांधाआड दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्या दिशेने झेप घेतली. दरम्यान, आपल्या शिवारात बिबट्याचा वावर आहे, याची पूर्वकल्पना दोघा भावांना असल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवत बिबट्याच्या दिशेने अंगावरील चादर फेकून दिल्याने बिबट्या बिथरला आणि पळून गेला. या चतुराईमुळे दोघा भावांचा जीव वाचला. मात्र, या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. सोंडले परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने रात्री पिकांना पाणी देणे धोकेदायक आहे. त्यामुळे ‘महावितरण’ने सोंडले फिडरवर रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rehan Vadra vs Bikaner House Censorship : बिकानेर हाऊस प्रशासन आणि रेहान वाड्रा यांच्यात वाद; आंदोलनाची ७० हून अधिक छायाचित्रे हटवल्याने संताप

Water Tanker : पाणी टँकरची लूट थांबणार; पुणेकरांसाठी महापालिकेचे विशेष ॲप लवकरच सुरू होणार

Pune Grand Tour Competition : पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

Record Breaking ENG vs SL Match : श्रीलंकेने ४३० धावांचे लक्ष्य पार केले, इंग्लंडला हरवले! इतिहास घडला, हॅरी ब्रूकचे द्विशतक व्यर्थ

Tibet Earthquake: विनाशकारी पुरानंतर तिबेटवर मोठे संकट! भूकंपाचे जोरदार धक्के; ७ रिश्टर स्केलचे हादरे बसताच...

SCROLL FOR NEXT