नाशिक

पित्याने केलेल्या हल्ल्यात एक मुलगी ठार एक गंभीर

CD
पान एक ------------ सोनगीरमध्ये जन्मदात्या बापाचा लेकींवर हल्ला एकीचा उपचारात मृत्यू, दुसरी गंभीर; गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा सोनगीर, ता. १२ : येथील बारी परिसरात राहणाऱ्या व मानसिक संतुलन बिघडलेल्या एका इसमाने स्वतःच्या दोन मुलींवर काचेच्या बाटलीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. या हल्ल्यात उपचारादरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसरीवर उपचार सुरू आहे. शनिवारी (ता. १२) सकाळी फॉरेन्सिक टीम आणि सोनगीर पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला. सेंधवा (जि. बडवाणी, मध्य प्रदेश) येथील मूळ रहिवासी असलेले सोलंकी गावी जात असताना शुक्रवारी (ता. ११) सकाळी दिनेश आसाराम सोलंकी (वय २१) याने वाहनातच पत्नी राधिका सोलंकी आणि त्याच्या मुली नित्या (वय २) व दिव्या (वय ४) यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे वाहनचालकाने त्यांना मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर बारी परिसरात उतरवून दिले. यामुळे दिनेशने पत्नीकडे धाव घेतली. पत्नी राधिका जीव वाचवून पळाली, मात्र दोन्ही निष्पाप मुली त्याच्या तावडीत सापडल्या. त्यानंतर दिनेशने जवळच असलेल्या पुलाखाली ओढत नेऊन तेथे पडलेल्या काचेच्या बाटलीने दोन्ही मुलींच्या डोक्यावर सपासप वार केले. घटनेनंतर दोन्ही मुली रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडल्या. घाबरलेल्या राधिकाने नातेवाईकांशी संपर्क साधला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने जखमी मुलींना हिरे मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवले. तेथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना दिव्या हिचे निधन झाले, तर नित्यावर उपचार सुरु आहे. संशयितावर गुन्हा दाखल दरम्यान, संशयित दिनेश सोलंकी यांच्यावर जिल्हा रुग्णालयात पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पत्नी राधिका दिनेश सोलंकी हिच्या जबाबावरून संशयित पती दिनेश आसाराम सोलंकी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT