नाशिक

सोनगीरला गणेश दर्शनासाठी गर्दी

CD
सोनगीरला गणेश दर्शनासाठी गर्दी सोनगीर, ता. १६ : येथील सर्व गणेश मंडळांचा दर्शनासाठी गावात उत्साह दिसत असून, ‘चांगला पाऊस पडू दे, शेत शिवार बहरू दे’ अशी मनोकामना केली जात आहे. तीन मंडळाना गणेशोत्सव साजरा करण्याचे पन्नासहून अधिक वर्षे झाले आहे. अनेक मंडळांनी २५ वर्षे पार केली आहेत. यंदा देखावे कमी पण मंडळांनी भव्य व अत्यंत सुंदर विलोभनीय गणेश मुर्ती, आकर्षक विद्युत रोषणाईवर भर दिला आहे. यंदा गणेश आगमनापासूनच उत्सवाची धूम असली तरी प्रत्येक मंडळाने मोठ्या देखाव्यांना फाटा दिला आहे. बहूतेक मंडळांनी गावातून वर्गणी गोळा करण्याचे टाळले. मंडळाच्या सदस्यांकडून जमलेल्या निधीवरच गणेशोत्सव साजरा करीत आहेत. मंडळांनी दोंडाईचा, नंदूरबार, धुळे, मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर व स्थानिक ठिकाणाहून भव्य गणेशमूर्ती आणल्या आहेत. काही मुर्तींची किंमत ४० ते ७० हजार पर्यंत उंची १४ ते १५ फुटांपर्यंत आहेत. भव्य मंडप व आकर्षक विद्युत रोषणाईने गाव झगमगले आहे. मंडळाकडून रात्री विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. काही मंडळातील सदस्य ढोल ताशांच्या गजरात रात्री उशिरापर्यंत लेझीम खेळताना दिसून येतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Squad for WI Series: रोहित शर्माच्या भविष्याचा फैसला झाला... वेस्ट इंडिजविरुद्ध BCCI ची वन डे, ट्वेंटी-२० संघाची घोषणा

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

Marathi News Live Updates : गणेशोत्सवानिमित्त भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांची मोहोळ यांच्या निवासस्थानी भेट

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

SCROLL FOR NEXT