नाशिक

शिरपूर : महाविद्यास अ दर्जा बातमी

CD
(पान ४ ला ॲंकर) SHC26B12687 शिरपूर : एसपीडीएम महाविद्यालयाची इमारत. डॉ.तुषार रंधे : SHC26B12688 आशा रंधे : SHC26B12689 --------- ‘एसपीडीएम’ वरिष्ठ महाविद्यालयाला विद्यापीठाची ‘अ’ श्रेणी शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन व विद्यार्थ्यांच्या यशाची विद्यापीठाकडून दखल सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. १४ : येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एसपीडीएम वरिष्ठ महाविद्यालयाला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या शैक्षणिक मूल्यांकनात प्रतिष्ठेची ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत यांनी दिली. महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन क्षेत्रातील कार्य, ग्रंथप्रकाशन, शोधनिबंध सादरीकरण, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रे, विविध कार्यशाळांचे आयोजन, विद्यार्थ्यांचे विद्यापीठीय परीक्षांतील यशस्वी निकाल, ऑनलाइन प्रश्नपत्रिका मूल्यांकनातील योगदान यांचा सखोल आढावा घेऊन विद्यापीठाने ही श्रेणी जाहीर केली. याशिवाय विविध स्पर्धांमधील विद्यार्थ्यांचे यश, परिसंवाद आणि चर्चासत्रांमध्ये प्राध्यापकांनी दिलेली व्याख्याने, शैक्षणिक उपक्रमांतील सातत्यपूर्ण सहभाग आणि गुणवत्ता वृद्धीसाठीचे प्रयत्न यांचीही विद्यापीठाने विशेष दखल घेतली. यापूर्वीही उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मूल्यांकनात तसेच नॅकच्या मूल्यांकन प्रक्रियेत महाविद्यालयाला ‘अ’ दर्जा प्राप्त झाला होता. त्यामुळे या नव्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सचिव निशांत रंधे, कोशाध्यक्षा श्रीमती आशाताई रंधे, विश्वस्त रोहित रंधे, माजी प्राचार्य डॉ. एस. एन. पटेल यांनी समाधान व्यक्त केले. -------------- संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या आधुनिक शैक्षणिक सुविधा, रोजगारक्षम अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, तळमळीचे व विद्वान प्राध्यापक वृंद, सुसज्ज दालने तसेच विद्यार्थी व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त परिश्रमांचे हे फलित आहे. - डॉ. तुषार रंधे, संस्थाध्यक्ष --------- विद्यार्थीभिमुख विविध उपक्रम, विद्यार्थिनींसाठी उपलब्ध करून दिलेल्या विशेष सुविधा, प्राध्यापकांचे संशोधन व लेखनकार्य, संस्थेने सुरू केलेले नवीन अभ्यासक्रम,सुसज्ज ग्रंथालय आणि आधुनिक प्रयोगशाळा अशा वैशिष्ट्यांमुळे महाविद्यालयास हा सन्मान प्राप्त झाला. - आशाताई रंधे, कोशाध्यक्षा -------- सिनेट सदस्य म्हणून मी सातत्याने विद्यापीठाच्या सभागृहात महाविद्यालयीन शैक्षणिक मूल्यमापन, विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी नव्या योजनांची आवश्यकता याबाबत मांडणी करीत आहे. हे महाविद्यालय नवनवीन शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू ठेवणार आहे. - निशांत रंधे, सचिव --------- विद्यार्थी- पालक संवाद उपक्रम, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, विद्यार्थी दत्तक योजना, विद्यार्थ्यांना दिले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा तसेच संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या विविध शैक्षणिक सुविधा यांचे हे यश आहे. - रोहित रंधे, विश्‍वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Decisions: राखीव उमेदवारांचा खुल्या जागांवर दावा संपुष्टात ते पुणे नदी प्रकल्पासाठी जमिनी विनामूल्य हस्तांतरित होणार

Monsoon Update : भारतात मॉन्सून वाटचालीस अनुकूल वातावरण, हवामान विभागाचा अंदाज अचूक; बंगालच्या उपसागरात तीव्रता वाढली

Shani Amavasya 2026 Unlucky Zodiac Signs: यंदाची शनि अमावस्या 'या' ४ राशींसाठी ठरणार चिंताजनक? आरोग्य, पैसा अन् नात्यांवर होऊ शकतो वाईट परिणाम; जाणून घ्या उपाय

Virat Kohli Century: मी सांगितलं होतं ना...! कृणाल पांड्याचे शब्द विराटने शतकासह करून दाखवले खरे; नेमकं काय घडलंय?

Latest Marathi News Live Update : बीड शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, 6 वर्षीय चिमुकल्यावर हल्ला

SCROLL FOR NEXT