डॉ. हेमराज कुमावत : SHC26B12929
डॉ. नदीम अंसारी : SHC26B12928
डॉ. मोहम्मदअली सय्यद : SHC26B12927
------------
शिरपूरच्या प्राध्यापकांची जागतिक कामगिरी
गौरवास्पद : १५३ देशांमध्ये युटिलिटी पेटंट प्रकाशित
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. २२ : येथील आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा.डॉ. हेमराज कुमावत, डॉ. नदीम अंसारी व डॉ. मोहम्मद अली सैय्यद यांच्या संयुक्त संशोधनातून विकसित करण्यात केलेल्या प्रगत दहन प्रणाली, थर्मोइलेक्ट्रिक विद्युतनिर्मिती, ऊर्जा पुनर्वापर व सुरक्षा सुविधांनी सुसज्ज उच्च कार्यक्षम बायोमास स्टोव्ह या अभिनव शोधाचे युटिलिटी पेटंट वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन (डब्ल्यूआयपीओ) ने प्रकाशित झाले असून, त्याला १५३ देशांमध्ये आंतरराष्ट्रीय संरक्षण व मान्यता प्राप्त झाली आहे.
ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्यासाठी व दैनंदिन समस्यांवर वैज्ञानिक उपाय म्हणून उच्च कार्यक्षमतेचा बायोमास स्टोव्ह प्राध्यापक त्रयींनी विकसित केला आहे. पारंपरिक चुलींमधून निघणार्या कार्बन मोनॉक्साइड आणि घातक प्रदूषकांमुळे घरातील हवा दूषित होऊन दरवर्षी लाखो लोकांचा श्वसनविकाराने अकाली मृत्यू होतो. या गंभीर समस्येवर या संशोधनातून उपाय काढण्यात आला आहे.
असे आहे तंत्रज्ञान
बायोमास स्टोव्हमध्ये बायमेटॅलिक स्ट्रिप्स किंवा शेप मेमरी अलॉय तंत्रज्ञानाद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा स्वयंचलितपणे नियंत्रित केला जातो. यामुळे इंधनाचे संपूर्ण ज्वलन होऊन धूर आणि प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी होते. इंधनातील ओलावा आणि घनता ओळखून आवश्यक बदल स्वयंचलितरित्या केले जातात. त्यामुळे इंधनाचा अपव्यय टाळता येतो. स्टोव्हमधील वाया जाणार्या उष्णतेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत केले जाते. ही वीज लहान बॅटरीमध्ये साठवून त्याद्वारे मोबाईल चार्जिंग आणि दिवे चालवणे शक्य होते. उरलेल्या उष्णतेचा वापर पाणी गरम करण्यासाठी किंवा धान्य, पिके वाळवण्यासाठी करता येतो. त्यांच्या संशोधनाचे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, विश्वस्त जयश्रीबेन पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेशा पटेल, संचालक अतुल भंडारी, डॉ. जे. बी. पाटील, उपसंचालक डॉ. पी. जे. देवरे आदींनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.