नाशिक

शिरपूर : मुस्लिम समाज मागणी

CD
SHC26B12945 शिरपूर : तहसीलदार महेंद्र माळी यांना निवेदन देताना पदाधिकारी. --------- पैगंबराविषयी वादग्रस्त वक्तव्याचा निषेध मुस्लिम समाजातर्फे गुन्हा दाखल करण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. २५ : मोहंमद पैगंबर यांच्याविषयी कथित अनुद्गार काढल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली. येथील तहसील कार्यालयात गुरुवारी (ता. २५) पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार महेंद्र माळी यांची भेट घेऊन निवेदन दिले. १९ जूनला इन्स्टाग्राम या समाज माध्यमावर एका पॉडकास्टमध्ये सूत्रसंचालिका दिव्या सिंह यांच्याशी संवाद साधतांना नाझिया इलाही खान या महिलेने हजरत मोहमंद पैगंबर यांच्याविषयी जाणीवपूर्वक आक्षेपार्ह, अवमानजनक व धार्मिक भावना दुखावणारी विधाने केली. हा व्हिडीओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाला असून, त्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. संबंधितांचे कृत्य भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा असून, त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. हा आक्षेपार्ह व्हिडीओ तातडीने समाज माध्यमांवरुन नष्ट करावा, नाझिया खान व दिव्या सिंह यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, भाजपचे नगरसेवक इरफान मिर्झा व जुमा मशिदीच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच अन् राष्ट्रवादी अजितदादांची! सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर CM फडणवीसांचे भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चा

IND vs SL 1st Test : बुमराहची अनुपस्थितीत, दोन गोलंदाजांपैकी निवडू कोणाला? शुभमन गिल पहिल्या सामन्यापूर्वी पेचात अडकला, म्हणाला...

Maruti Suzuki Offer: ऑगस्टमध्ये कार खरेदीची मोठी संधी! तब्बल 1.85 लाखांपर्यंत फायदा; Grand Vitara, Balenoसह कोणत्या कारवर किती ऑफर?

अमिताभ बच्चन यांच्या ‘जुम्मा चुम्मा दे दे’ गाण्याने रातोरात स्टार झाली, कुटुंबासाठी सोडली इंडस्ट्री; आता कुठे आहे अभिनेत्री?

Marathi News Live Updates : शिवसेना अन् राष्ट्रवादी कुणाची? २०२४ च्या 'लोकन्यायालया'चा दाखला देत फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना टोला

SCROLL FOR NEXT