SHC26B12947
शिरपूर : नियुक्तीपात्र विद्यार्थ्यांसह प्राचार्य डॉ. एस. बी. बारी व सहकारी.
---------
पटेल फार्मसीच्या प्रशिक्षण,
प्लेसमेंट सेलची उल्लेखनीय कामगिरी
शिरपूर, ता. २५ : येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या प्रशिक्षण व प्लेसमेंट सेलने २०२५- २६ या शैक्षणिक वर्षात मध्ये विद्यार्थी विकास, कौशल्यवृद्धी आणि रोजगारनिर्मितीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असून सन फार्मा, रॅप्टीम फार्मा आणि अजंता फार्मा यांसारख्या नामांकित कंपन्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटद्वारे ३० हून अधिक विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळाली.
विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास, संवाद कौशल्य, मुलाखत तंत्र, करिअर मार्गदर्शनासह परदेशातील उच्च शिक्षणाविषयी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. ‘डीकोडेड ९.०’ यांच्या सहकार्याने क्लिनिकल सॅस कोर्सही यशस्वीपणे राबविण्यात आला.उद्योग-संवाद वाढविण्यासाठी सन फार्मा, मेंटोरिया, स्प्रिंगवेल फार्मा आणि एच. एल. असोसिएट्स यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता आणि व्यावसायिक कौशल्ये अधिक बळकट झाल्याचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी सांगितले. या कामगिरीचे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेशा पटेल यांनी कौतुक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.