नाशिक

शिरपूर : विद्यार्थी सुयश बातमी

CD
नायपर जेईई परीक्षेत पटेल फार्मसीचे विद्यार्थी चमकले शिरपूर, ता. २५ : येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नायपर जेईई २०२६ परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. नयन चित्ते यांनी देशपातळीवर २०७ वा क्रमांक मिळवत महाविद्यालयात अव्वल स्थान पटकावले. मयूर चव्हाण (५१०), रूपेश देवरे (८०६), वसुधा पाटील (९४४), तुषार पाटील (१००४), सुजाता भामरे (१२२०), निरजसिंह परदेशी (२३७८), सौरव पाटील (२४२०), वैष्णवी सोनवणे (२४९८), सर्वेश पाटील (३२२३) आणि प्रशांत देसले (३४५९) यांनीही लक्षणीय यश मिळविले. यापूर्वी जीपॅट २०२६ परीक्षेतही महाविद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांनी यश मिळविले होते. त्यामध्ये मयूर चव्हाण यांनी २९३ गुणांसह देशपातळीवर ८५ वा क्रमांक पटकावला होता. विद्यार्थ्यांच्या यशामागे नायपर व जीपॅट मार्गदर्शन वर्ग, तज्ज्ञ व्याख्याने, ऑनलाइन टेस्ट सिरीज आणि प्राध्यापकांचे वैयक्तिक मार्गदर्शन यांचा मोठा वाटा असल्याचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी सांगितले. नायपर जेईई परीक्षा समन्वयक डॉ. झेड. जी. खान व प्रा. सुहास आगे यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाचे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेशा पटेल आदिंनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Toxic Liquor: पुण्यातील विषारी दारूकांडावरून विधान परिषदेत गदारोळ; सरकार संवेदनशील नसल्याचा विरोधकांचा आरोप, सत्ताधाऱ्यांचाही उलटवार

Shaktipeeth Highway Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता तरीही शक्तिपीठविरोधात ठराव; काँग्रेसच्या दबावामुळे भाजप सदस्यांचाही विरोध

कालीन भैया-गुड्डू पंडित पुन्हा आमनेसामने! 'मिर्झापूर'चा रक्तरंजित खेळ आता थिएटरमध्ये; 4 सप्टेंबरला होणार मोठा धमाका

Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

SCROLL FOR NEXT