SHC26B12953
शिरपूर : महेश नवमीचे पूजन करताना पदाधिकारी.
-------------
महेश नवमीनिमित्त
शिरपूरला विविध उपक्रम
शिरपूर, ता. २५ : येथील तालुका माहेश्वरी समाज व माहेश्वरी महिला मंडळ यांच्यातर्फे महेश नवमी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे साजरी करण्यात आली.
एस. एम. पटेल सभागृहात समाजाच्या इतिहास व कार्यावर आधारित डिजिटल सादरीकरण करण्यात आले. गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच ऑल इंडिया ॲग्रो इनपुट्स डीलर असोसिएशनच्या विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन प्रशिक्षक रमेश परतानी (हैदराबाद) यांनी सकारात्मक आणि संस्कारयुक्त पालन- पोषण या विषयावर मार्गदर्शन केले. गायत्री मंदिरात भगवान महेश यांचे पूजन, आरती व प्रसाद वितरण कार्यक्रम झाला. मुकेशभाई पटेल ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात १८ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.
स्वामीनारायण मंदिरात बालकांसाठी अध्यात्म व संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षा मंजू झंवर, उपाध्यक्षा तथा जिल्हा संघटन मंत्री मीनाक्षी राठी, स्नेहा गगरानी, सचिव अरुणा मुंंदडा, पूनम राठी, कोशाध्यक्षा कविता भंडारी, प्रदेश समिती सहसंयोजिका अमृता भंडारी, जिल्हा सचिव अतुल भंडारी, तालुकाध्यक्ष विनय भंडारी, सचिव डॉ. दिनेश भक्कड, उपाध्यक्ष राहुल धूत, सहसचिव नीरज भंडारी, कोशाध्यक्ष विवेक राठी, संघटन मंत्री डॉ. लक्ष्मीकांत झंवर, सदस्य स्वप्निल राठी, कुणाल राठी, कल्पेश बजाज यांनी संयोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.