नाशिक

शिरपूर : विधानसभा प्रारूप मतदार यादी बातमी

CD
(पान ४ ला मेन) SHC26B13290 शिरपूर : प्रारूप मतदार यादीबाबत माहिती देताना प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी. -------- शिरपूर मतदारसंघात ३२ हजार मतदारांची घट डॉ. शरद मंडलिक यांची माहिती; चार मतदान केंद्र वाढली सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ३१ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर- २०२६) अंतर्गत शिरपूर (अ. ज.) विधानसभा मतदारसंघात यापूर्वीच्या मतदार यादीच्या तुलनेत ३२ हजार ६०२ मतदारांची घट झाली आहे. तर मतदान केंद्रांच्या संख्येत चारने वाढ झाली आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी यांनी सोमवारी (ता. ३१) दिली. ------ ‘एसआयआर- २०२६’ अंतर्गत १ ऑक्टोबर २०२६ ही अर्हता दिनांक धरून मतदार यादीचे सखोल पुनरीक्षण करण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर शिरपूर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ३३६ वरून ३४० इतकी झाली आहे. पूर्वीच्या मतदार यादीत एकूण तीन लाख ५१ हजार १८६ मतदार होते. त्यामध्ये एक लाख ७६ हजार २७२ पुरुष, एक लाख ७४ हजार ९०८ महिला आणि सहा तृतीयपंथी मतदारांचा समावेश होता. प्रारूप मतदार यादीत एकूण तीन लाख ७ हजार २३६ मतदार असून, त्यात एक लाख ५६ हजार ३८८ पुरुष, एक लाख ५० हजार ८४२ महिला आणि सहा तृतीयपंथी मतदार आहेत. पुनरीक्षण प्रक्रियेत १८ हजार ४६४ मतदारांच्या नोंदींमध्ये विसंगती आढळल्या असून, १४ हजार १३८ मतदारांची नो मॅपिंग नोंद झाली आहे. तसेच, एकूण ३२ हजार ६०२ मतदारांच्या नोंदींवर सुनावणी आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रक्रियेत चार नवीन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये मतदान केंद्र क्र. ३८- खाऱ्या दोंदवाडा, मतदान केंद्र क्र. १०३- आंबाफाटा, मतदान केंद्र क्र. १३८- नवी सांगवी आणि मतदान केंद्र क्र. ३२८- सावेर यांचा समावेश आहे. प्रांताधिकारी डॉ. शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, निवडणूक नायब तहसीलदार आर. पी. कुमावत यांनी मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून आवश्यक असल्यास विहित मुदतीत दावे अथवा हरकती दाखल करण्याचे आवाहन केले आहे. ------ दावे- हरकतींसाठी ३० सप्टेंबरची मुदत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर नागरिकांना ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. प्राप्त दावे व हरकतींबाबत ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नोटिसा देऊन सुनावणी घेऊन त्यांचा निपटारा करण्यात येणार आहे. ‘एसआयआर- २०२६’ ची सुधारित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ ला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिल्ली-महाराष्ट्रात कोट्यवधी मतदारांची नावं वगळली; SIR ड्राफ्टमध्ये तुमचं नाव आहे का? कसं चेक करायचं?

Horoscope: जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांची खास स्थिती; ‘या’ ४ राशींचं नशीब अचानक चमकणार? पैसा, करिअरमध्ये प्रगतीसह मोठ्या धनलाभाचे संकेत

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

Marathi News Live Updates : भारतातील बोगदा बचाव पथकाची नेपाळी लष्करासोबत भागीदारी

‘निपुण’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल! खोल समुद्रातील मोहिमा करणार, पाणबुडी बचाव क्षमतेला बळ; पाहा वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT