नाशिक

शिरपूर : धनगर समाज गुणगौरव बातमी

CD
SHC26B13292 शिरपूर : गुणगौरव सोहळ्यातील सत्कारार्थींसह पदाधिकारी. --------- शिक्षणातूनच समाजाची प्रगती सुनील वाघ : धनगर समाज कर्मचारी मंचतर्फे गुणवंतांचा गौरव सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ३१ : कष्टाळूपणा, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आणि एकता ही धनगर समाजाची बलस्थाने आहेत. दीर्घकाळ संघर्ष करुन आज समाजाचा सामाजिक स्तर उंचावला आहे. पालकांनी मुलामुलींच्या उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे, शिक्षणातूनच समाजाची प्रगती होईल, याची सदैव जाणीव ठेवावी, असे आवाहन धनगर समाज महासंघाचे सरचिटणीस सुनील वाघ यांनी केले. येथील धनगर समाज कर्मचारी मंचतर्फे तालुक्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम रविवारी (ता. ३०) पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. महादेवभाई धनगर यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. प्रकल्प विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, ज्येष्ठ नेते उखा ठाकरे, प्रियदर्शिनी सूतगिरणीचे संचालक सुदाम भलकार, ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे, राजाराम तेले, जिजाबराव तेले, भिका तेले, रमण तेले, पंडित धनगर, अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समितीचे प्रमुख योगेश बागले, टेकवाडेचे सरपंच दिलीप धनगर, सी. जी. तेले, छोटू कंखरे, निंबा धनगर, दशरथ धनगर, संजय धनगर, मुकेश बिलाडे, कुरखळीच्या सरपंच सुचित्रा धनगर, हिंमत धनगर, पितांबर धनगर, मनोज धनगर, सुनील भलकार, यशवंत धनगर, चिंतामण लांडगे, वाल्मिकी आढगाळे, बिपिन तेले, गणपत धनगर आदी उपस्थित होते. देविदास निळे यांनी धनगर समाज कर्मचारी मंचच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. योगेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र ठाकरे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. जगदीश धनगर व गांगेश्वर धनगर यांनी सूत्रसंचालन केले. समाजातील ९५ गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करुन ३५ होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. निवृत्त कर्मचारी ज्ञानेश्वर हडप, पंडित न्हाळदे, श्रीकृष्ण चौधरी, मुख्याध्यापक बन्सीलाल न्हाळदे, पदोन्नतीपात्र असली येथील आर. सी. पटेल प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूषण पेंढारकर, केंद्रप्रमुख सूरज गावंडे, लिंबाजी प्रताळे, सुभाष भलकार, संतोष न्हाळदे, संदेश हजारे, उषा मनोरे, कपिल धनगर, सुषमा निळे, दीपक मनोरे व प्रेरणा नंदाळे यांचा सत्कार करण्यात आला. रतिलाल पाकळे, मुकुंदा पाकळे, दिलीप पाकळे, अरुण सोनवणे, प्रा. उदय भलकार, रामचंद्र भलकार, किशोर ठाकरे, गोपाल ठाकरे, सुरेश आढगाळे, संदीप झटकर, महेश धनगर, ब्रिजलाल धनगर, नंदलाल भामरे, प्रा. सतीश निळे, भास्कर धनगर, प्रेमराज हिवराळे, समाधान धनगर, विशाल भलकार, निलेश आढावे, मुकेश आढावे, संतोष आढगाळे, भरत आढावे, गणेश अहिरे, रवी धनगर, योगेश ठाकरे व नकुल ठाकरे यांनी संयोजन केले.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

SCROLL FOR NEXT