नाशिक

शिरपूर : दीक्षांत समारंभ बातमी

CD
SHC26B13297 शिरपूर : दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांसोबत अरुण नंदा, डॉ. सुनीता पाटील, राजगोपाल भंडारी व सहकारी. ------- बदलांशी जुळवतांना सामाजिक मूल्यांचे भान ठेवा अरुण नंदा : एनएमआयएमएसच्या ३३१ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ३१ : कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमेशन, शाश्वतता आणि डिजिटल परिवर्तनामुळे व्यावसायिक क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. या बदलांशी जुळवून घेत असतांना सामाजिक मूल्यांचे भान ठेवा आणि मूल्यांची जपणूक करणारा समाज घडवा, असे आवाहन महिंद्रा हॉलिडेज ॲन्ड रिसॉर्ट इंडिया लि. चे माजी कार्यकारी संचालक तथा अध्यक्ष अरुण नंदा यांनी केले. येथील एस.व्ही.के.एम. नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (एनएमआयएमएस) शिरपूर कॅम्पसचा १६ वा दीक्षांत समारंभ नुकताच झाला. त्यावेळी ते बोलत होते. संचालक राजगोपाल भंडारी अध्यक्षस्थानी होते. श्री. नंदा म्हणाले, बदलत्या काळात कर्तव्य, नीतीमूल्ये, सातत्याने शिकण्याची वृत्ती आणि सामाजिक जबाबदारी यांना महत्त्व देणे आवश्यक आहे. आपल्याला एक नीतीमान समाज तयार करावयाचा आहे. त्यासाठी युवकांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. संचालिका डॉ. सुनीता पाटील यांनी अहवाल सादर करतांना शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोन्मेष, उद्योग क्षेत्राशी संलग्नता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना शाश्वततेची शपथ देतांना नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, समानता, सामाजिक जबाबदारी आणि उत्तरदायित्व यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन करण्यात आले. अकॅडमिक ॲन्ड स्पोर्ट्स अ‍ॅन्युअल रिपोर्ट २०२५-२६ चे प्रकाशन करण्यात आले. एमपीएसटीएमईचे २५२, एसपीटीएमचे ४३, एसएएसटीचे २६ आणि स्कूल ऑफ कॉमर्सचे दहा विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. प्रशासकीय अधिकारी शिवाजी गायकवाड, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयोजन केले. पदवीपात्र विद्यार्थ्यांचे एसव्हीकेएम संस्थेचे अध्यक्ष व एनएमआयएमएस अभिमत विद्यापीठाचे कुलपती आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, राजगोपाल भंडारी, शिरपूर कॅम्पस प्रभारी रिटा पटेल यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Old Monkच्या चाहत्यांनो सावधान! ७ वर्ष जुन्या दाव्यावर कंपनीची माघार, बाटलीचा लेबल बदलणार

Manoj Jarange Patil : जरांगेंचा ‘चलो मुंबई’ नारा! मराठा बांधव मुंबईकडे कूच करण्यासाठी सज्ज

OBC Mahamorcha : ओबीसी समाजाची मोठी तयारी! १ सप्टेंबरला पाटसहून महामोर्चा

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

SCROLL FOR NEXT