नाशिक

शिरपूर : कला मंडळ उद्घाटन

CD
SHC26B13308 शिरपूर : मार्गदर्शन करताना साहित्यिक भिमराज पावरा. शेजारी पदाधिकारी. ----- बोलीभाषा सांस्कृतिक अस्मिता जपणारे माध्यम भिमराज पावरा : पटेल महाविद्यालयात कला मंडळाचे उद्‌घाटन सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ३ : बोलीभाषा ही त्या प्रदेशाच्या सांस्कृतिक अस्मितेचे जतन करणारे प्रभावी माध्यम असून, बोलीभाषेतील साहित्यामुळे स्थानिक संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे वास्तववादी प्रतिबिंब उमटते, असे मत चोपडा (जि. जळगाव) येथील साहित्यिक भिमराज पावरा यांनी व्यक्त केले. येथील एच. आर. पटेल कला व विज्ञान महिला महाविद्यालयात कला मंडळाची स्थापना नुकतीच करण्यात आली. या मंडळाच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. प्राचार्य डॉ. गजानन पाटील अध्यक्षस्थानी होते. डॉ. युवराज पवार यांनी प्रास्ताविकात कला मंडळाच्या उद्दिष्टांची माहिती देऊन वर्षभर वाचन, लेखन, वक्तृत्व, संभाषण कौशल्य, भित्तीपत्रक, काव्य व कथालेखन आदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. भिमराज पावरा यांनी विद्यार्थिनींनी प्रमाण भाषेसोबत मातृभाषेतील बोलीभाषेतही लेखन करावे, असे आवाहन केले. त्यांनी पावरी बोलीतील दोन कविता तसेच ‘वातरा’, ‘कहाणी’ व ‘कोडे’ सादर करून बोलीभाषेची समृद्धता आणि लोकजीवनाशी असलेले नाते उलगडले. प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांनी कला, साहित्य व सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते, असे सांगून मोबाईलचा वापर मनोरंजनासोबत ज्ञानार्जन व सर्जनशीलतेसाठी करण्याचे आवाहन केले. डॉ. इंदिरा गिरासे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. गुलाबसिंह वळवी यांनी आभार मानले. डॉ. मनीषा चौधरी, प्रा. अंकेश पावरा, प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बापटांना मारहाण, पंडितना अटक! मुख्यमंत्री फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पुण्यासारख्या ठिकाणी...

Elina Svitolina Interview : युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाचे पतीसोबत ग्रँडस्लॅम जिंकण्याचे स्वप्न! न्यूयॉर्कमधील अनुभवाबद्दल मारल्या गप्पा

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांना २४ तास पोलिस सुरक्षा; पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत खडसावलं

बॅडमिंटन खेळताना क्षुल्लक वाद, ११ वर्षांच्या मुलानं खिशातून चाकू काढला; ९ वर्षीय मुलाचा मृत्यू, घटना CCTVत कैद

Janmashtami Kids Dress Up: मुलांना राधा अन् कृष्णाचा लुक द्यायचायं? घरच्या घरी चिमुकल्यांना 'असे' द्या गोंडस रूप!

SCROLL FOR NEXT