नाशिक

शिरपूर : गणेशोत्सव बैठक बातमी

CD
(पान ४ ला मेन) SHC26B13314 शिरपूर : गणेश मंडळांना सूचना देताना अपर अधीक्षक अजय देवरे. शेजारी डीवायएसपी सुधीर पाटील, निरीक्षक किशोरकुमार परदेशी आदी. ------------- डीजे संस्कृती हद्दपार करा अजय देवरे : शिरपूरला गणेश मंडळांच्या बैठकीत निर्देश सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. ४ : महाराष्ट्राच्या थोर सांस्कृतिक परंपरेचा डीजे हा भाग असूच शकत नाही. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करुन डीजेंच्या गोंगाटात वर्तमान आणि येणाऱ्या पिढीचे भविष्य बधीर करु नका. यंदाच्या गणेशोत्सवातून डीजे संस्कृती हद्दपार करा, असे आवाहन अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांनी केले. शिरपूर शहर, तालुका व थाळनेर पोलिस ठाण्यातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (ता. २) सायंकाळी येथील शकुंतला लॉन्समध्ये आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. डीवायएसपी सुधीर पाटील, निरीक्षक किशोरकुमार परदेशी, सहायक निरीक्षक हेमंत पाटील, वीज कंपनीचे सहायक अभियंता विजय पवार, आगारप्रमुख महेंद्र पाटील, वाहतूक नियंत्रक मनोज पाटील, उपमुख्याधिकारी भामरे आदी उपस्थित होते. श्री. देवरे म्हणाले, की डीजेवर बंदीचा विषय आला म्हणजे डीजे मालकांच्या रोजगाराचा मुद्दा पुढे केला जातो. प्रत्यक्षात एक किंवा दोन जणांनाच डीजेमुळे रोजगार मिळतो. त्याऐवजी पारंपरिक वाद्य पथकांची स्थापना केली तर किमान दहा जणांना रोजगार मिळू शकेल, हे लक्षात घेणे गरजेचे आहे. डेसिबलची मर्यादा ओलांडली तर कठोर कारवाई होईल, हे लक्षात घ्यावे. आपल्या शहरातील परिस्थिती लक्षात घेऊन श्रींच्या मूर्तीची उंची ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. ताराबाई ठाकूर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख कन्हय्या चौधरी, ज्येष्ठ नेते राजू टेलर, विजयसिंह राजपूत, राजेश सोनवणे, भरतसिंह राजपूत, महेंद्र माळी, अतुल सिसोदिया यांनी मनोगत व्यक्त केले. उपनिरीक्षक वर्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत पाटील यांनी आभार मानले. -------- मंडळांची नोंदणी अनिवार्य सुधीर पाटील यांनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. किशोरकुमार परदेशी यांनी गणेशोत्सवासंदर्भात प्रशासनाकडून जारी निर्देश व नियमांची माहिती देतांना प्रत्येक सार्वजनिक मंडळाने नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Industrial Estate : सैनिक टाकळीत 'गायरान' जमिनीची प्रांताधिकाऱ्यांकडून पाहणी; प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला विरोध कायम, उदय सामंतांनी काय दिलं आश्वासन?

धनंजय-पार्वती चढले बोहल्यावर! ‘अशी ही बनवाबनवी’चा AI VIDEO पाहून हसू अवरेना, तुम्ही पाहिलात का?

Crime: अग्रिपाड्यात दुहेरी हत्याकांड! १९ वर्षीय पत्नीची गळा चिरून हत्या, नंतर स्वतःलाही संपवलं; धक्कादायक कारण समोर

Marathi News Live Updates : धुळ्यात एसटी बसचा भीषण अपघात, ट्रकची जोरदार धडक, ४५ विद्यार्थी जखमी, ६ जणांची प्रकृती गंभीर

Nagpur Hotel Universe Case: हॉटेल युनिव्हर्समध्ये देहव्यवसाय, मालकाला अटक

SCROLL FOR NEXT