SHC26B13333
हिसाळे (ता. शिरपूर) : श्री गोरक्षनाथ महाराज मंदिर.
-------
हिसाळे येथे रविवारी
दादागुरु भगवान यांचा सत्संग
शिरपूर, ता. ९ : हिसाळे (ता. शिरपूर) येथील श्री गोरक्षनाथ महाराज मंदिरात रविवारी (ता. १३) सकाळी दहाला महायोगी समर्थ भैय्याजी सरकार तथा दादागुरु भगवान यांचे आगमन होणार आहे. सत्संग, धार्मिक प्रबोधन, नर्मदा सेवा परिक्रमा संदेश व महाप्रसादाचे आयोजन केले आहे, अशी माहिती सेवेकऱ्यांतर्फे देण्यात आली.
अनेरच्या निसर्गरम्य परिसरात श्री गोरक्षनाथ महाराज मंदिर सोनबडी आखाड्याचे श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. मंदिराला सुमारे शंभर वर्षांची परंपरा असून, स्थानिक भदाणे परिवाराला आलेल्या आध्यात्मिक अनुभवातून या स्थळाची सुरुवात झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. नाथ संप्रदायाचे अग्रणी योगी बालकनाथ (अस्तल बोहर, राजस्थान) यांच्याहस्ते मंदिराच्या जीर्णोद्धार कामाला प्रारंभ झाला. जळगाव व धुळे जिल्ह्यांसह चोपडा, शिरपूर आणि अनेर परिसरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. दरवर्षी लाखो भाविक मंदिराला भेट देतात. संपूर्ण श्रावण महिनाभर येथे नियमित भंडारा सुरू असतो. त्यासाठी प्रकाश बाविस्कर यांचे मोठे योगदान लाभते. श्रावणाच्या अखेरीस होणाऱ्या महाप्रसादात सुमारे १५ ते २० हजार भाविक सहभागी होतात, असे कांतीलाल पाटील यांनी सांगितले.
दादागुरुंचे आकर्षण
दादागुरु भगवान यांची उपस्थिती यंदाच्या श्रावणातील प्रमुख आकर्षण आहे. अनुयायांच्या दाव्यानुसार, त्यांनी ऑक्टोबर २०२० पासून अन्नत्याग करून नर्मदा जलावर साधना सुरू ठेवली आहे. कठोर महाव्रत, पदयात्रा आणि निसर्गाशी एकरूप जीवनशैलीमुळे ते चर्चेत आहेत. नदी संरक्षण, वृक्षारोपण, गोसेवा, व्यसनमुक्ती आणि समाजजागृती आदि क्षेत्रात ते सक्रीय आहेत. पुजारी माधवनाथ महाराज, कांतीलाल पाटील, प्रकाश बाविस्कर, नरेंद्र पाटील, विकास भदाणे, विनोद पाटील, ज्ञानेश्वर पाटील, जिजाबराव पाटील, राजेंद्र पाटील, विजय पाटील, दत्तात्रय पाटील, सुनील पाटील आदींनी संयोजन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.