पान तीन
---------------------
13345
शिरपूर : संशयित आणि मुद्देमालासह निरीक्षक किशोरकुमार परदेशी व सहकारी.
मंगळसूत्र चोरणाऱ्या इराणी टोळीचा सराईताला पत्नीसह अटक
३० ग्रॅम सोने जप्त; शिरपूर पोलिसांची वेशभूषा बदलून कारवाई
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. १२ : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून दहशत माजवणारे भुसावळ येथील कुख्यात ''इराणी गँग''च्या सराईत गुन्हेगाराला शिरपूर शहर पोलिसांनी शिताफीने अटक केली. आशू तथा हसन अली नियाज अली इराणी (वय २४, रा. पापा नगर, भुसावळ) असे संशयिताचे नाव असून, त्याच्यासह त्याची पत्नी फातिमा हसन अली इराणी (वय २१, रा. मुस्लिम कॉलनी, भुसावळ) हिलाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने (लगडी) जप्त केले असून, यामुळे शिरपूरसह राज्यातील अनेक पोलिस ठाण्यांतील जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. संशयित हसन इराणी याच्याविरुद्ध यापूर्वी विविध जिल्ह्यांत जबरी चोरी, आर्म्स ॲक्ट आणि मारहाणीचे तब्बल २६ गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक जितेंद्र महाजन, हवालदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, आरीफ तडवी, सचिन वाघ, गोविंद कोळी, मनोज महाजन, योगेश दाभाडे, विनोद आखडमल, भटू साळुंके, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, सोमा ठाकरे आणि नीलेश चौधरी यांच्या पथकाने केली.
-------------
असा घडला होता गुन्हा
२४ जुलैला रात्री साडेआठला हिरा नगर परिसरातील रहिवासी मीना कैलास अग्रवाल (वय ६१) व मीराबाई आसाराम धनगर पायी जात होत्या. त्याचवेळी दुचाकीवर आलेल्या दोन संशयितांनी त्यांच्या गळ्यातील अनुक्रमे ८ ग्रॅम आणि ७ ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत बळजबरीने हिसकावून पलायन केले होते. या प्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
---------
वेशभूषा बदलून कारवाई
सीसीटीव्ही फुटेज आणि बातमीदारांच्या माहितीवरून हा गुन्हा भुसावळ येथील इराणी गँगचा गुन्हेगार आशू ऊर्फ हसन अली इराणी आणि त्याचा साथीदार सादिक अली इबादत अली इराणी यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने भुसावळ, फैजपूर, सावदा, उदळी आणि काहुरखेडा परिसरात पाठलाग केला. अखेर हरताळा (ता. मुक्ताईनगर) येथील ''बिस्मिल्ला हॉटेल'' येथे संशयित बसलेला असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी वेशभूषा बदलून शिताफीने हसन इराणीच्या मुसक्या आवळल्या.
------------
दागिने खरेदी करणाऱ्या सराफासह पत्नीवर कारवाई
हसन इराणीने चोरीची मंगलपोत पत्नी फातिमा इराणी हिच्याकडे दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी फातिमाला ताब्यात घेतले असता, तिने हे दागिने भुसावळ येथील व्यावसायिक ओम जयबहादूर ठाकूर याला विकल्याचे सांगितले. सराफाने दागिने वितळवून लगडी बनवल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी ७५ हजार रुपये किमतीच्या ३० ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या लगडी जप्त केल्या. पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी फातिमालाही अटक करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.