नाशिक

शिरपूर : फिजिओथेरपी शिबीर बातमी

CD
SHC26B13362 खर्दे बुद्रूक : फिजिओथेरपी शिबिराचे उद्‌घाटन करताना आमदार अमरीशभाई पटेल, डॉ. अली इराणी, भूपेशभाई पटेल व पदाधिकारी. ------- नियमित तपासणीतून आजारांचा धोका कमी डॉ. इराणी : तपनभाई पटेल रुग्णालयात रूग्णांची फिजिओथेरपी तपासणी सकाळ वृत्तसेवा शिरपूर, ता. १७ : डॉ. इराणी यांनी आरोग्यात फिजिओथेरपीची भूमिका, नियमित व्यायाम, शरीराची हालचाल आणि आजारांपासून प्रतिबंधात्मक पद्धतीने स्वतःचे आरोग्य जपण्याबाबत मार्गदर्शन करुन दैनंदिन जीवनात योग्य शारीरिक हालचाल आणि वेळेवर आरोग्य तपासणी केल्यास विविध आजारांचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते, असे मत आंतरराष्ट्रीय फिजिओथेरपिस्ट तथा भारतीय क्रिकेटपटूंचे मुख्य फिजिओ मार्गदर्शक डॉ. अली ईराणी यांनी व्यक्त केले. जागतिक फिजिओथेरपी दिनासह माजी मंत्री तथा आमदार अमरीशभाई पटेल यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त खर्दे बुद्रूक (ता. शिरपूर) येथील तपनभाई पटेल मेमोरिअल हॉस्पिटल, मेडिकल कॉलेज व रिसर्च सेंटर आणि अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनतर्फे आयोजित पाच दिवसीय फिजिओथेरपी शिबिराच्या पहिल्या दिवशी १३६ जणांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. १५ ते १९ सप्टेंबर या कालावधीत हे शिबिर सुरू राहणार आहे. एस.व्ही.के.एम.चे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन करण्यात आले. (कै.) तपनभाई पटेल यांचे प्रतिमापूजन करण्यात आले. एस.व्ही.के.एम.चे सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, विश्वस्त जयश्रीबेन पटेल, कृतिबेन पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, मुंबई येथील डॉ. मानसी भारतीया, डॉ. सबाहा थावेर, डॉ. सागर तबंदेह, डॉ. खदीज मेनाई, डॉ. मीनाम बेग, प्रकल्प संचालक जी. बी. गुजर, सीईओ डॉ. संतोष पवार आदी उपस्थित होते. अस्तित्व फाउंडेशनच्या समन्वयिका सोनिया भसीन यांनी प्रास्ताविक केले. योगेश्वर माळी यांनी संस्थेच्या कार्याबाबत माहिती दिली. ------ नागरिकांसाठी विशेष सुविधा या विशेष शिबिरात नागरिकांसाठी नोंदणी शुल्क नसून आठपेक्षा अधिक तपासण्या केवळ ९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात वजन, उंची, बीएमआय व कंबरेचा घेर, रक्तदाब, नाडी व ऑक्सिजनची पातळी, दोन मिनिटांचा वॉक टेस्ट, हृदयाच्या फिटनेसची तपासणी, बॅलन्स व चालण्याच्या गतीची तपासणीसह स्नायूंच्या ताकदीचे मूल्यांकन, मेंदू व नर्व्हस सिस्टिमची क्विक स्क्रीनिंग आणि तोल जाण्याच्या धोक्याचे मूल्यांकन करण्यात येत आहे. शिबिरासाठी दूरध्वनी क्रमांक (०२५६३) ३५१५०३ व टोल फ्री क्रमांक १८०० ८९०९ १११ येथे संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Maratha Reservation Protest: जेवळीतील पाण्याच्या टाकीवर ‘शोले स्टाईल’ आंदोलन; उपोषण स्थगित तरी मराठा आरक्षणासाठी लढा कायम

विजांचा कडकडाट अन् वादळी वाऱ्याचा तडाखा! कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांत मुसळधारेचा इशारा

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

SCROLL FOR NEXT