नाशिक

शिंदखेडा शिवारात पाच ब्रास अवैध वाळूसाठा जप्त

CD
SKD26B04213 शिंदखेडा : प्लॉटवर टाकलेल्या अवैध वाळू साठ्याचा पंचनामा करताना महसूल विभागाचे अधिकारी. ------------ शिंदखेडा शिवारात पाच ब्रास अवैध वाळूसाठा जप्त महसूल विभागाची कारवाई; अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी प्लॉटवर टाकली वाळू सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. ४ : शिंदखेडा शिवारातील गट क्रमांक ७६९/७७० मधील प्लॉट क्रमांक ४८ मध्ये अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी आणून टाकलेला सुमारे पाच ब्रास वाळूसाठा महसूल विभागाने जप्त केला. नगरपंचायतीचे माजी विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील बाजीराव चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून महसूल विभागाने शुक्रवारी (ता. ४) ही कारवाई केली. प्लॉट क्रमांक ४८ हा सुनील चौधरी यांचे बंधू प्रल्हाद चौधरी यांच्या पत्नीच्या नावावर आहे. गुरुवारी रात्री अज्ञात व्यक्तीने या प्लॉटवर वाळू आणून टाकली होती. शुक्रवारी सकाळी हा प्रकार सुनील चौधरी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ महसूल विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच महसूल विभागाचे मंडल अधिकारी जितेंद्र चव्हाण यांच्यासह प्रमोद पांडेन, रमीजअली सैय्यद, तुषार पवार व महेश परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. पंचनाम्यात सदर वाळूसाठा अंदाजे पाच ब्रास असल्याचे आढळून आले. त्यानंतर महसूल विभागाने हा वाळूसाठा ताब्यात घेत जप्तीची कारवाई केली. दरम्यान, संबंधित प्लॉटधारकांच्या परवानगीशिवाय अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी वाळू आणून टाकल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. वाळू कोणी आणून टाकली, याबाबत महसूल विभागाकडून पुढील चौकशी करण्यात येत आहे.

US Diesel Price: अमेरिकेला महागाईच्या झळा! 'डिझेल'च्या दरांमध्ये ऐतिहासिक वाढ; दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्या

मुंबईत आरे मेट्रो स्टेशनखाली भीषण आग, लक्झरी बसने अचानक घेतला पेट, धक्कादायक VIDEO समोर...

Marathi News Live Updates : काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी 7 जणांना अटक

Vaibhav Sooryavanshi साठी BCCI चा मास्टरप्लान! सचिवांचा खुलासा, 'तो केवळ एका सीझनचा स्टार राहू नये...'

DWIDHA MOVIE REVIEW: वडील आणि मुलीच्या नात्यातील भावनिक गुंतागुंत दाखवणारा, मनाला भिडणारा चित्रपट ‘द्विधा’

SCROLL FOR NEXT