SKD26B04217
शिंदखेडा : भारतीय जैन संघटनेतर्फे शिक्षक- प्राध्यापकांचा सत्कार करताना शिक्षक व जय संघटनेचे पदाधिकारी.
------
भारतीय जैन संघटनेतर्फे शिक्षक- प्राध्यापकांचा सत्कार
शिंदखेड्यातील जैन स्थानकात सन्मानपत्र देऊन गौरव
सकाळ वृत्तसेवा
शिंदखेडा, ता. ६ : भारतीय जैन संघटनेच्या शिंदखेडा शाखेतर्फे शहरातील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अध्यापन करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. जैन स्थानकात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैन संघाचे अध्यक्ष राजमल बोथरा होते. पोलिस निरीक्षक मयूर भामरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
भारतीय जैन संघटनेचे खानदेश अध्यक्ष प्रा. चंद्रकांत डागा यांनी संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. शिक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. संघटनेतर्फे नैसर्गिक आपत्ती निवारण, जलसंधारण, शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. या वेळी कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत अध्यापन करणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला. एम.एच.एस.एस. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे गोपाल परमार, संदीप भदाणे, अजय माळी, परेश शाह, एस.एस.व्ही.पी.एस. ज्युनिअर कॉलेजचे पंकज चव्हाण, मुकेश पाटील, हरी बच्छाव, जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे एम.डब्ल्यू. तमखाने, के.व्ही. ठाकरे, श्री समर्थ हायस्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे भूपेंद्र भदाणे, मराठे विद्यालयाच्या स्मिता परीक्षित देशमुख, एस.एस.व्ही.पी.एस. सीनियर कॉलेजचे डॉ. प्रा. सिद्धार्थ सावंत, डॉ. प्रा. सचिन जाधव, डॉ. प्रा. जितेंद्र पाटील तसेच बीजेएसचे एमएसएमई ट्रेनर प्रा. चंद्रकांत डागा यांचा सत्कार करण्यात आला.
पोलिस निरीक्षक मयूर भामरे, प्रा. परेश शाह, डॉ. प्रा. सिद्धार्थ सावंत, डॉ. प्रा. जितेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी मनोहर पारख यांनी प्रायोजकत्व दिले. या वेळी संघटनेचे कोषाध्यक्ष सुरेश गडिया, जैन श्री संघाचे सचिव राजेंद्र बाफना, माजी अध्यक्ष सजनराज कवाड, प्रवीण पारख, राकेश कर्नावट, रमेश कर्नावट आदी उपस्थित होते. सी. डी. डागा यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.