नाशिक

शिंदखेडा नगरपंचायत व मीराबाई गर्ल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

CD
शिंदखेड्यात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा शिंदखेडा, ता. १२ : विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन शिंदखेडा नगरपंचायत व मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत मातीपासून आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. कार्यशाळेत एकूण १५५ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवून १०१ सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. गणेशोत्सवाच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण, पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी शाडू माती व नैसर्गिक साहित्यापासून गणेशमूर्ती तयार करण्याचे महत्त्व विद्यार्थिनींना कलाशिक्षक अतुल मराठे व दिव्यानी पाटील यांनी समजावून दिले. कार्यशाळेत मूर्ती तयार करण्याची योग्य पद्धत, आकार देण्याचे तंत्र आणि नैसर्गिक रंगांचा वापर याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींनी आपल्या कल्पकतेचा वापर करून विविध आकारांच्या सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. ‘गणपती बाप्पा मोरया, पर्यावरणाचे रक्षण करूया!’ असा संदेश देत विद्यार्थिनींनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. कार्यशाळेच्या आयोजनासाठी मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक जे. पी. पाटील, संचालक एम. वाय. पवार, नगरपंचायतीचे प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ, आरोग्य निरीक्षक जितेंद्र अहिरे, शहर समन्वयक रवींद्र पाटील, राहुल पाटील उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Savings: 10 रुपयांची बचत करून पती-पत्नी वर्षभरात करतील 1 लाखांचा फंड! ना SIP, ना शेअर मार्केट; काय आहे हे चॅलेंज?

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरण! आमदारपुत्र रोहित गावितला चार दिवसांची पोलीस कोठडी; काल मीरा रोडवरून घेतले होते ताब्यात

Girna Dam Water Storage : नाशिक अन् गुजरातच्या पावसाने गिरणा धरण फुल्ल! 21 हजार हेक्टर शेती फुलणार; काय आहे ताजी स्थिती?

गणपती बसवायचा आणि १५ सप्टेंबरला मुंबईला जायचं; मराठ्यांचं वादळ मुंबईत कधी धडकणार?

Marathi News Live Updates : पुढील २४ तास विदर्भात पावसाची शक्यता,३ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT