नाशिक

जप्त पाच ब्रास वाळूचे घरकुल लाभार्थ्यांना वाटप

CD
SKD26B04236 शिंदखेडा : घरकुल लाभार्थ्यांना जप्त वाळूचे वाटप करताना महसूल विभागाचे अधिकारी. --------- जप्त पाच ब्रास वाळूचे घरकुल लाभार्थ्यांना वाटप शिंदखेडा, ता. १० : महसूल विभागाने जप्त केलेल्या पाच ब्रास बेवारस वाळूसाठ्याचे घरकुलच्या पात्र लाभार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिलेल्या माहितीनंतर महसूल विभागाने शिंदखेडा शिवारात कारवाई करून बेवारस वाळूचा साठा जप्त केला होता. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील घरकुल लाभार्थ्यांची वाळूची गरज लक्षात घेऊन या जप्त वाळूचे नियोजनबद्ध वाटप केले. यामध्ये सायजाबाई उदा भिल (साबरहट्टी) यांना दोन ब्रास, भुपेंद्र नामदेव कोळी (साबरहट्टी) यांना एक ब्रास, नामदेव भुरसिंग भिल (बंगला भिलाटी) यांना एक ब्रास, तर सायसिंग न्हानभाऊ भिल (वरपाडा रोड, बंगला भिलाटी) यांना एक ब्रास वाळू देण्यात आली. घरकुल उभारणीसाठी आवश्यक असलेली वाळू मोफत मिळाल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. जप्त वाळूचा योग्य पद्धतीने वापर करून गरजू घरकुल लाभार्थ्यांना मदत केल्याने महसूल प्रशासनाने सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SACHIN TENDULKAR: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या अन् सचिन तेंडुलकरांचं लक्ष वेधलं; रमाबाईसाठी मास्टर ब्लास्टरने घेतला खास निर्णय

Hartalika Katha: हरतालिकेची कहाणी! हवा तसा नवरा मिळावा म्हणून महिला का करतात व्रत! माता पार्वती-भगवान शंकरांची संपूर्ण कथा वाचा इथेच

Marathi News Live Updates : माधुरी हत्तीण वनतारातून नांदणीच्या दिशेने रवाना; मनोज पाटील यांची माहिती

Kannad News : माझ्यावर जी वेळ आली ती कोणावरही येऊ नये! एकीकडे मुलगा मृत, दुसरीकडे पती आयसीयूत; मुलगीही रुग्णालयात उपचाराधीन

Hadapsar Fire Incident: हडपसर माळवाडीतील विहार कॉलनीत भीषण आग; आठ पत्र्यांची घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटाने परिसरात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT