नाशिक

शिंदखेडा रेल्वे स्थानकावर नवीन प्रवासी गाडी सुरू करण्याची मागणी

CD
(फोटो- रेल्वेचा फोटो घेणे) ---------- शिंदखेडा स्थानकातून नवीन प्रवासी गाडी द्या खासदार शोभा बच्छाव यांचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. १७ : तालुका मुख्यालय असलेल्या शिंदखेडा रेल्वे स्थानकावर उधना- नंदुरबार- पुणे मार्गावरील नवीन प्रवासी गाडीला नियोजित थांबा देऊन ती सुरू करावी, अशी मागणी खासदार शोभा बच्छाव यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शिंदखेडा रेल्वे स्थानक हे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचे मध्यवर्ती स्थानक आहे. शिंदखेडा शहरासह परिसरातील सुमारे ५० ते ६० गावांतील नागरिक शिक्षण, उद्योग, रोजगार तसेच अन्य कामांसाठी या स्थानकावरून नियमित प्रवास करतात. त्यामुळे वाढती प्रवासी संख्या आणि नागरिकांची गरज लक्षात घेता या भागाला अधिक चांगली रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देण्यासाठी नवीन प्रवासी गाडी सुरू करणे आवश्यक असल्याचे खासदार बच्छाव यांनी निवेदनात नमूद केले आहे. उधना- नंदुरबार- पुणे मार्गावर प्रस्तावित नवीन प्रवासी गाडीला शिंदखेडा रेल्वे स्थानकावर नियोजित थांबा देण्यात यावा आणि ही गाडी लवकरात लवकर सुरू करावी, अशी विनंती त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही खासदार बच्छाव यांनी व्यक्त केली आहे. नवीन गाडी सुरू झाल्यास शिंदखेड्यासह परिसरातील गावांमधील विद्यार्थी, कामगार, व्यावसायिक आणि अन्य प्रवाशांना पुणे, नंदुरबार तसेच मार्गावरील प्रमुख शहरांशी रेल्वेने प्रवास करणे अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

SCROLL FOR NEXT