नाशिक

हस्ती बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मोतीबिंदू तपासणी, रक्तदान शिबिर

CD
SKD26B04272 शिंदखेडा : रक्तदान करताना रक्तदाते सोबत हस्ती बँक शिंदखेडा शाखेचे चेअरमन जितेंद्र पाटील, अनिल वानखेडे आदी पदाधिकारी. --------- हस्ती बँकेच्या वर्धापनदिनी मोतीबिंदू तपासणी, रक्तदान शिबीर रुग्णांची नेत्रतपासणी; ४१ जणांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. २० : हस्ती को-ऑपरेटिव्ह बँक (मल्टीस्टेट)च्या शिंदखेडा शाखेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी (ता. १७) मोफत मोतीबिंदू तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालय, नंदुरबार यांच्या सहकार्याने झालेल्या नेत्रतपासणी शिबिरात २१० गरीब व गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. संबंधित रुग्णांवर रुग्णालयात लेन्स बसवून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच रुग्णांचा प्रवास, निवास, चहा-नाश्ता, भोजन, औषधे व काळा चष्मा आदी सुविधाही मोफत देण्यात येणार आहेत. शिबिराचे उद्‌घाटन उज्वला गिरीश टाटिया यांच्या हस्ते झाले. डॉ. तुषार देवरे व त्यांच्या पथकाने सहकार्य केले. मनीषा जितेंद्र पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्‌घाटन झाले. या वेळी ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. नवजीवन रक्तपेढीचे डॉ. सुनील चौधरी व त्यांच्या पथकाने सहकार्य केले. वर्धापन दिनानिमित्त सत्यनारायण महापूजाही झाली. बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन मदन जैन व किशोर जैन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. प्रा. डॉ. जितेंद्र पाटील, अनिल वानखेडे, हितेंद्र जैन, ॲड. अशोक गुजराथी, मनोहर भोजवानी, गिरीश टाटिया, शाखा व्यवस्थापक राहुल मराठे यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT