नाशिक

‘राधे रमणा, गोविंदा’च्या जयघोषात बालाजी रथोत्सवाला प्रारंभ आज पालखी

CD
SKD26B04380 शिंदखेडा : रथ मिरवणुकीत बालाजी महाराजांचा रथ ओढताना परिसरातील भाविक. -------- ‘राधे रमणा, गोविंदा’च्या जयघोषात बालाजी रथोत्सवाला प्रारंभ आज सायंकाळी पालखीची मिरवणूक; फटाक्यांची होणार आतशबाजी सकाळ वृत्तसेवा शिंदखेडा, ता. २६ : आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईने उजळलेल्या भव्य रथावर श्री बालाजी महाराजांची मूर्ती विराजमान होताच ‘राधे रमणा गोविंदा, वेंकट रमणा गोविंदा’च्या जयघोषाने शिंदखेडा नगरी दुमदुमली. ढोल- ताशांचा गजर आणि घंटानादात पारंपरिक बालाजी रथोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. शहरासह परिसरातील हजारो भाविकांनी रथाचे दर्शन घेत रथ ओढण्याचा मान मिळविला. परंपरेनुसार आज (ता. २७) सायंकाळी सहाला पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता रथ गल्लीतील श्रीराम बालाजी मंदिरात मठाधिपती मेघश्याम बुवा यांच्या हस्ते श्री बालाजी महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर राऊळ घराण्यातील हिम्मतसिंह राऊळ यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. परंपरेनुसार व्यंकटेशाची मूर्ती रथावर विराजमान करण्यात आली. दुपारी एक वाजता घंटानाद, ढोल-ताशांचा गजर आणि ‘राधे रमणा गोविंदा, वेंकट रमणा गोविंदा’च्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. रथमार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी श्री बालाजी महाराजांची आरती करून केळ्यांचा नैवेद्य अर्पण केला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भक्तिमय वातावरणात रात्री उशिरापर्यंत रथ मिरवणूक सुरू होती. रथावर सेवेकऱ्यांची उपस्थिती रथावर प्रा. प्रदीप दीक्षित, राहुल जोशी, सुहास जोशी, सोमनाथ पिले, धनंजय गिरासे, हेमंत जोशी, ललित पाठक, नंदकिशोर जोशी, संकेत कुलकर्णी, राम कुलकर्णी, कृष्णकांत गिरासे, देवेंद्र जोशी, मायू जोशी, धनंजय पाठक, अरविंद गिरासे, प्रदीप चतुर्वेदी आदी ब्राह्मण बांधव सेवा देत होते. रथाला गतिमान ठेवणे व त्यावर नियंत्रण राखण्याची जबाबदारी दयाराम माळी, अनिल लोहार, कोमलसिंह गिरासे, जीवन लोहार आणि गिरीश लोहार यांनी सांभाळली. घनकरी म्हणून मोतीराम बडगुजर, बारकू बडगुजर, अशोक बडगुजर, अभिमान मिस्तरी, उमाकांत मिस्तरी, दिलीप गिरासे, दादाभाई गिरासे, भगवान गिरासे, सुरेश माळी आदींनी सहकार्य केले. महावितरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त रथमार्गावरील विद्युत तारांमुळे अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महावितरणच्या पथकाने विशेष काळजी घेतली. सहाय्यक अभियंता भावेश टेटू यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ तंत्रज्ञ जयेश पवार, सुनील खैरनार, संजय पाटील, राकेश पवार, मुकेश बोरसे, सुनील नगराळे, संतोष अहिरे, पांडुरंग पाटील, विशाल कोळी, प्रदीप बडगुजर, जावेद पठाण, जितेंद्र पाटील आणि राहुल गव्हाणे आदींनी काम पाहिले. पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Piyush Goyal : दीडशे वर्षांपासून जपलेली भारताशी नाळ; आता विकासगाथेत सहभागी व्हा; सुरिनाममार्गे नेदरलॅंड्समध्ये आलेल्या भारतीय समुदायाला गोयल यांचे आवाहन

Piyush Goyal : रॉटरडॅम बंदराची हरित दिशा भारताच्या उपयोगाची; गोयल यांनी घेतला आढावा

देशात खळबळ! माजी शिक्षणमंत्र्यांना शंभर कोटींच्या लाच प्रकरणात अटक; तामिळनाडू सरकारची मोठी कारवाई

Maharashtra Live News: ‘बार्टी’, ‘सारथी’ला पूर्णवेळ प्रमुख देण्याची मागणी

Google Hiring Tips: गुगलमध्ये नोकरी मिळवायचीये? कंपनीच्या रिक्रूटरनेच सांगितल्या ५ महत्त्वाच्या टिप्स; रिझ्युमेपासून इंटरव्ह्यूपर्यंत सगळं जाणून घ्या !

SCROLL FOR NEXT