नाशिक

बिबट्यापासुन बच्याव

CD
(पान ४ ला ॲंकर) SMD26B01012 बल्हाणे : येथील गौरव बिरारीस यांनी बिबट्यापासून बचावासाठी तयार केलेले ‘लिओपार्ट’ उपकरण. -------- बिबट्याचा वावर ९३.८१ टक्क्यांनी घटल्याचा दावा बल्हाणेच्या गौरव बिरारीस यांच्या ‘लिओपार्ट’ उपकरणाची यशस्वी चाचणी सकाळ वृत्तसेवा सामोडे, ता. २२ : बिबट्या- मानव संघर्ष कमी करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘लिओपार्ट’ या उपकरणामुळे बिबट्याचा वावर आणि दर्शनाचे प्रमाण तब्बल ९३.८१ टक्क्यांनी घटल्याचा दावा पिंपळनेर येथील वन्यजीव अभ्यासक व संशोधक गौरव बिरारीस यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या संशोधनानंतर विकसित करण्यात आलेल्या या उपकरणाच्या विविध जिल्ह्यांतील प्रत्यक्ष चाचण्यांचे निष्कर्ष नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. गौरव बिरारीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘लिओपार्ट’ हे उपकरण बिबट्याला कोणतीही इजा न करता नैसर्गिकरीत्या विशिष्ट क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी विकसित करण्यात आले आहे. नोव्हेंबर- डिसेंबर २०२३ पर्यंत फॉर्म्युलेशन, एनकॅप्सुलेशन, रिलीझ प्रोफाइल ऑप्टिमायझेशन आणि प्रॉडक्ट कॉन्फिगरेशनसंदर्भातील प्रयोग पूर्ण झाल्यानंतर २०२४ च्या सुरुवातीला या उपकरणाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर ५ एप्रिल २०२४ पासून विविध भागांत प्रत्यक्ष क्षेत्रीय चाचण्यांना सुरुवात करण्यात आली. या चाचण्या नाशिक, धुळे आणि पुणे जिल्ह्यातील बिबट्याचा वावर अधिक असलेल्या भागांमध्ये घेण्यात आल्या. यामध्ये उंबरखेड (ता. निफाड), बाहरे, चिकशे (देगाव रोड), जहुले, बल्हाणे, शिरवाडे, गांगेश्वर, पापडीपाडा, म्हेळुस्के (ता. दिंडोरी), म्हसदी, मुंगसरे, मंचर, उंबरखेड पाणथळ, धनखडी, पारगाव, नवापाडा, खळवाडी- बल्हाणे, शेणपूर (ता. साक्री), पिंपळखेते, तांदुळवाडी, मलांजन शिवार, बोरगाव (ता. सुरगाणा), सुकापूर, देशशिरवाडे, होळ्याचा पाडा आणि पाटस्थळ- शिरवाडे आदी ठिकाणांचा समावेश होता. ---------- - ५२ उपकरणे बसविली - ३५ ठिकाणांवरील नोंदींचे विश्लेषण - ७३ टक्के ठिकाणी बिबट्या पूर्णपणे अदृश्य - उपकरण बसविण्यापूर्वी बिबट्या दिसण्याचे सरासरी प्रमाण ९.०६ इतके - उपकरणानंतरचे प्रमाण केवळ ०.५६ पर्यंत खाली आले - बिबट्याच्या दर्शनाच्या प्रमाणात ९३.८१ टक्के घट झाल्याचा निष्कर्ष - उपकरण लावल्यानंतरही बिबट्या दिसण्याचे प्रमाण सरासरी ८३ टक्क्यांनी कमी - उपकरणापासून १०० ते ५०० मीटर अंतरावर बिबट्याचे दर्शन ----------- या अभ्यासातील सर्वाधिक प्रभावी उदाहरण नाशिक जिल्ह्यातील बोरगाव (ता. सुरगाणा) येथे आढळले. महिन्यात २० पेक्षा अधिक वेळा दिसणारा बिबट्या उपकरण बसवल्यानंतर एकदाही दिसला नाही. विशेष म्हणजे सात ते आठ महिन्यांनंतर उपकरण काढून टाकल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. या ठिकाणी उपकरणाने १५ महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रभावी परिणाम दाखविला. - गौरव बिरारीस, संशोधक, बल्हाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT