नाशिक

बिबट्याचा बंदोबस्त करा वनविभागाला निवेदन

CD
(पान ४ ला मेन) SMD26B01133 पिंपळनेर : बिबट्याला जेरबंद करण्याच्या मागणीचे निवेदन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देताना ग्रामस्थ. ------- सामोडे शिवारात बिबट्याचा मुक्त संचार शेतकरी धास्तावले; वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी सकाळ वृत्तसेवा सामोडे, ता. ३ : साक्री तालुक्यातील सामोडे परिसरात बिबट्या आणि दोन बछडे मुक्तपणे फिरत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामोडे येथील रहिवासी शिवाजी भिकन शिंदे यांच्या शेतात हे दृश्‍य दिसून आले. त्यामुळे शेतशिवारात काम करणाऱ्या शेतकरी, शेतमजूर तसेच पशुपालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ---------- विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी बिबट्याचा वावर आढळून आला आहे, त्याच्या अगदी बाजूलाच माणसांच्या राहण्याची खोली तसेच गाईंचा गोठा आहे. शेतकऱ्यांना शेतीची कामे, पाणी व्यवस्थापन आणि जनावरांची देखभाल करण्यासाठी रात्री- पहाटे शेतात जावे लागते. त्यामुळे बिबट्याचा मुक्तसंचार कोणत्याही क्षणी गंभीर दुर्घटनेला आमंत्रण ठरू शकतो. बिबट्याचा वावर असलेले शेत वस्तीपासून अवघ्या २०० मीटर अंतरावर असल्याने ग्रामस्थांची चिंता आणखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वी याच बिबट्यांना वस्तीच्या आसपासच्या भागातही पाहण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. त्यामुळे बिबट्यांचा वावर आता केवळ जंगल किंवा शिवारापुरता मर्यादित राहिलेला नसून मानवी वस्तीकडेही त्यांची वाटचाल होत असल्याचे चित्र आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या आणि दोन पिल्ले स्पष्टपणे दिसत असल्याने वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन परिसरात पाहणी करावी, बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घ्यावा आणि आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे बसवावेत, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. ‘दुर्घटना होण्याची वाट पाहू नका!’ वन्यप्राण्यांचा वावर वाढत असताना एखाद्या नागरिकावर किंवा शेतकऱ्यावर हल्ला झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. मनुष्यहानी किंवा पशुधनाची हानी होण्यापूर्वीच वनविभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी पिंपळनेरच्या वनपरिक्षेत्र कार्यालयाला निवेदन देण्यात आले. या वेळी अभय शिंदे, केतन शिंदे, महेंद्र शिंदे, कमलेश शिंदे, विश्वजित भदाणे, अमोल शिंदे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyanand Bapat: विद्यानंद बापट यांना २४ तास पोलिस सुरक्षा; पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी स्पष्ट शब्दांत खडसावलं

MS Dhoni: एमएस धोनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही; CSKच्या माजी खेळाडूने सांगितलं, ‘धोनीला पूर्णवेळ यष्टीरक्षक म्हणूनच खेळायचंय’

काव्यार्थचं बाळ पाहिलत का? ‘फर्स्ट लूक’ समोर; ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेचा प्रोमो पाहून चाहते म्हणाले...

बॅडमिंटन खेळताना क्षुल्लक वाद, ११ वर्षांच्या मुलानं खिशातून चाकू काढला; ९ वर्षीय मुलाचा मृत्यू, घटना CCTVत कैद

Marathi News Live Updates : विभागीय आयुक्त कार्यालयात सुनेत्रा पवारांची बैठक सुरु

SCROLL FOR NEXT