नाशिक

अवैध वाळू वाहतुकीवर सटाणा पोलिसांचा दणका पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त; हायवा चालकाविरोधात गुन्हा

CD
06870 सटाणा : पोलिसांनी जप्त केलेला वाळूने भरलेले हायवा सटाणा पोलिसांची वाळू तस्करावर कारवाई वाळूने भरलेल्या हायवासह सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. १५ : तालुक्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात सटाणा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सटाणा-ताहराबाद मार्गावर केलेल्या या कारवाईत पोलिसांनी वाळूने भरलेला हायवा ताब्यात घेत तब्बल ५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वाहनचालक गणेश दिलीप अहिरे (वय २८, रा. दहिवड, ता. देवळा) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सटाणा-ताहराबाद मार्गावरून अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून विशेष मोहीम राबविली. दरम्यान, ताहराबादकडून सटाण्याकडे येणारा संशयित हायवा पोलिसांनी अडवून त्याची कसून तपासणी करत चालकाकडे वाळू वाहतुकीसंदर्भातील वैध परवाना किंवा अधिकृत कागदपत्रांची मागणी केली असता, त्याच्याकडे कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाहीत. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे १६ ब्रास वाळू मिळून आली. त्यानंतर पोलिसांनी हायवासह वाळू असा एकूण ५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT