नाशिक

पावसासाठी भगवान शंकरांना साकडे

CD
महेश नवमीनिमित्त सटाण्यात शोभायात्रा सकाळ वृत्तसेवा सटाणा, ता. २५ : माहेश्वरी समाजाच्या उत्पत्ती दिनानिमित्त श्री माहेश्वरी प्रगती मंडळातर्फे महेश नवमी निमित्त बालाजी मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. शहरातील प्रमुख मार्गावर पारंपरिक वेशभूषा, भगव्या पताका, जयघोषात निघालेल्या शोभायात्रेतून सामाजिक ऐक्य, समता आणि बंधुभावाचा संदेश देण्यात आला. यंदा भरपूर पाऊस पडून शेतकरी सुखावावा, राज्यात समृद्धी नांदावी आणि सर्वांवर भगवान महेशाची कृपा राहावी, अशी प्रार्थना करण्यात आली. भगवा चौकात हरी ओम नागरी पतसंस्था तसेच मल्हार रोडवर अरिहंत ग्रुपतर्फे शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. शोभायात्रेत माहेश्वरी व राजस्थानी समाजातील महिला, पुरुष, युवक-युवती आणि बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सांगतेनंतर बालाजी मंदिरात भगवान महादेवांची पूजा, भजन-कीर्तन व आरती करण्यात आली. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडिया, आशिष हेडे, कैलास तोष्णीवाल, डॉ. जीवन झंवर, गोविंद सोनी, अतुल भन्साळी, कमलकिशोर भांगडिया, नंदकिशोर भांगडिया, प्रदीप भांगडिया, अरुण अग्रवाल, डॉ. अनिल सोनी, दीपक भांगडिया, पवन भांगडिया, विशाल नवगजे, प्रतीक जाजू, रिंकू भांगडिया, अभिषेक हेडे, समर्थ भांगडिया, पन्नालाल भांगडिया, सपना भांगडिया, रेखा सोनी, पुष्पा हेडा, विशाखा भांगडिया, अलका नवगजे, कीर्ती भांगडिया, तृप्ती भांगडिया, नेहा भांगडिया, वैशाली भांगडिया आदींनी परिश्रम घेतले. सटाणा : श्री महेश नवमी उत्सवानिमित्त निघालेल्या शोभायात्रेत सहभागी बांधव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामना नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार?

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT