नाशिक

घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव सहभागी व्हा

CD
कळवणच्या बतामीच चौकट घ्यावा ‘घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सहभागी व्हा’ सटाणा ः नगर परिषदेतर्फे आयोजित ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत शहरवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांनी केले. नगराध्यक्षा पाटील यांनी ‘स्वच्छ, सुंदर, संस्कारी व पर्यावरणपूरक सटाणा’ ही संकल्पना बळकट होण्यासाठी पालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान’ अंतर्गत घरगुती पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ आयोजित केली असल्याचे सांगितले. स्पर्धेत शाडूची मूर्ती, नैसर्गिक सजावट आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या नागरिकांना भाग घेता येईल. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास नगराध्यक्षा हर्षदा पाटील यांच्याकडून ११ हजार रुपये, द्वितीय क्रमांकासाठी उपनगराध्यक्षा सोनाली बैताडे यांच्याकडून सात हजार, तर तृतीय क्रमांकासाठी शिक्षण सभापती चेतन अशोक मोरे यांच्याकडून पाच हजारांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत. नागरिकांनी आपल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा व्हिडिओ तयार करून ९६६५६१५२७७ या क्रमांकावर पाठवावा. परीक्षण समितीच्या निर्णयानुसार निकाल जाहीर करण्यात येणार आहे. उपनगराध्यक्षा सोनाली बैताडे, शिवसेना गटनेता राहुल पाटील, भाजपचे गटनेता चेतन रौंदळ, मनीषा पवार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पुणेकरांची पहाट पावसाने उजाडली! साडेसहापर्यंत मुसळधार पाऊस; कोणत्या भागांत कोसळल्या जोरदार सरी?

November 1 New Rules : नोव्हेंबरपासून देशभरात नवे नियम लागू; गॅस सिलिंडर, दूध, सीएनजी महागले, FASTag मध्येही बदल

Marathwada Water Crisis: मराठवाड्यात पाणीप्रश्न पेटला! कुठे शेतकऱ्यांचा समृद्धी महामार्गावर रास्ता रोको, तर कुठे महिलांचे टाकीवर ‘शोले स्टाइल’ आंदोलन

LPG Cylinder Price Hike : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका ! व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या मुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील नवे दर

Pune Weather Update: पुणेकरांसाठी हवामानाची गुड न्यूज! तापमानात घट होणार, पुढील दोन ते तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT