नाशिक

अयोध्या ते काठमांडू ६७७ किलोमीटर अंतर धावून केले पूर्ण सिन्नरच्या लेकींचा विश्वविक्रम

CD
SNR26B20978 सिन्नर ः अयोध्या ते पशुपतिनाथ हे अंतर विश्वविक्रमी वेळेत धावून पूर्ण करणाऱ्या आदिती मुदगुल, श्रेया उगलमुगले. ---------------- सिन्नरच्या लेकींचा विश्वविक्रम -------- अयोध्या ते काठमांडू अंतर धावून केले पूर्ण ------------ सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १४ ः येथील दोन मुलींनी अयोध्या ते पशुपतिनाथ (काठमांडू, नेपाळ) हे ६७७ किलोमीटर अंतर सात दिवस पंधरा तास इतक्या विक्रमी वेळेत धावून पूर्ण केले. या विश्वविक्रमाचे तालुक्यातून स्वागत केले जात आहे. मातोश्री निर्मला गोपाळ कुलकर्णी विद्यालयाची आदिती संदीप मुदगल (१४), नवजीवन डे स्कूलची श्रेया सुनील उगलमुगले (१३) या मुलींनी हा विश्वविक्रम केला. काश्मीर ते कन्याकुमारी अंतर विश्वक्रमी वेळेत धावून पूर्ण करणारे अभिजित भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली दोघींनी ही कामगिरी केली. आदित्य तोडमल, सुनील उगलमुगले, संदीप मुद्गगुल यांचे सहकार्य लाभले. या दोघींच्या विक्रमाची गिनीच बुक रेकाँर्ड व आंतरराष्ट्रीय बुक आँफ वर्ल्ड रेकॉडमध्ये नोंद झाली आहे. ५ मे पासून त्यांनी अयोद्या येथील राम मंदिरापासून धावण्यास सुरुवात केली होती. १२ मेला दुपारी २ वाजून १२ मिनिटांनी पशुपतिनाथ येथे पोचून हे अंतर पूर्ण केले. उष्णता, नेपाळमधील उंच डोंगर दऱ्यातून धावताना अनेक अडचणींचा सामना दोघींना करावा लागला. तथापि, जिद्दीच्या जोरावर त्यांनी हा विक्रम केला. दररोज ८० ते ९५ किलोमीटर धावण्याचे सातत्य त्यांनी ठेवले होते. या विक्रमामुळे सिन्नरच्या नावावर आणखी एक विश्वविक्रम नोंदवला गेला आहे. --------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT