नाशिक

आवारेंच्या अटकेमुळे स्टाईसच्या प्रतिमेला धक्का विरोधी संचालकांचे सत्ताधाऱ्यांना खांदेपालटाचे आवाहन

CD
अध्यक्ष बदलाच्या मागणीने स्टाइसमध्ये खळबळ नामकरण आवारे यांच्या अटकेनंतर विरोधी संचालक आक्रमक सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. १५ : नामकरण आवारे यांना अटक झाल्यानंतर सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत (स्टाइस) येथे अध्यक्ष बदलाच्या मागणीने वातावरण तापले आहे. आवारे यांच्या प्रकरणामुळे वसाहतीची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत विरोधी संचालकांनी सत्ताधारी गटाने त्यांना दिलेला अध्यक्षपदाचा पाठिंबा तातडीने काढून घ्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे. स्टाइसमध्ये १२ संचालकांपैकी आठ संचालक सत्ताधारी गटात असून त्यामध्ये आवारे यांचाही समावेश आहे. तर चार संचालक विरोधी गटात आहेत. विरोधी संचालक अविनाश तांबे, पंडित लोंढे, सुधा माळोदे आणि बाबासाहेब दळवी यांनी याबाबत प्रसिद्धीस निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, भोंदू अशोक खरात याच्याशी आवारे यांचे निकटचे संबंध असल्याची माहिती वसाहतीतील संचालक व सभासदांना आहे. अशा परिस्थितीत वसाहतीच्या प्रतिमेला धक्का बसूनही सत्ताधारी संचालक आवारे यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा कायम ठेवत आहेत. त्यामुळे खरात यांच्या कथित गैरकृत्यांना अप्रत्यक्ष समर्थन दिले जात असल्याचा आरोपही विरोधी गटाने केला आहे. जगदंबा माता पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणात आवारे यांना अटक झाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांनी मौन बाळगणे अनैतिक असल्याचे विरोधी संचालकांचे म्हणणे आहे. सभासदांनी संस्थेच्या हितासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी संचालकांची निवड केली असून सत्ताधाऱ्यांनी याबाबत तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. आवारे यांचा १५ दिवसांच्या रजेचा अर्ज अटक झाल्यानंतर शुक्रवारी (ता. १५) आवारे यांनी अध्यक्षपदाच्या कामकाजातून १५ दिवसांची रजा मंजूर करण्याबाबतचा अर्ज स्टाइस कार्यालयात पाठविला. या घडामोडीमुळे विरोधी संचालकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोट सहकार कायद्याच्या चौकटीत राहून जे योग्य असेल तो निर्णय सत्ताधारी संचालक घेतील. आवारे यांच्यावर अद्याप गुन्हा सिद्ध झालेला नाही. संस्थेत उद्योजकांच्या हिताचे काम व्हावे, राजकारण होऊ नये. - रामदास डापसे, उपाध्यक्ष, स्टाइस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: चेन्नई सुपर किंग्सचे अंतिम ४ मध्ये पोहोचणे अवघड! लखनौ सुपर जायंट्सने स्वतःसह त्यांची पण वाट लावली...

महाराष्ट्रात मालमत्ता वादांवर लगाम लागणार! मोजणीशिवाय आता होणार नाही म्युटेशन; फ्लॅटधारकांनाही प्रॉपर्टी कार्ड मिळणार

Police Officer Transfers : राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या! संजय दराडे पुण्याचे सह पोलिस आयुक्त तर गुन्हे शाखेच्या अतिरिक्त आयुक्तपदी तेजस्वी सातपुते

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्स एका फटक्यात तीन संघांचा कार्यक्रम करणार; एक गणित ज्याने भल्याभल्यांची झोप उडणार

Mumbai News : गुगल बरोबर ॲपललाही नोटीस; बाईक टॅक्सी सेवेला झटका, राज्य सायबर विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT