नाशिक

निपेऱ्या पुस्तकाचे सिन्नरला प्रकाशन

CD
फोटो-21520 सिन्नर ः निपेऱ्या पुस्तकाचे प्रकाशन करताना संदीप सांगळे, रविराज इळवे, देवा झिंजाड, विष्ण वाघ आदी. निपेऱ्या पुस्तकाचे सिन्नरला प्रकाशन सिन्नर, ता. २३ ः येथील वारकरी भवनात विष्णू वाघलिखित निपेऱ्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ग्रामीण बोली, बदलते ग्रामजीवन, प्रथा, परंपरा यांचे प्रतिबिंब असलेल्या पुस्तकाचे अनेकांनी कौतुक केले. पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे, अप्पर कामगार आयुक्त रविराज इळवे, पेन पब्लिशिंग हाउस प्रकाशनचे देवा झिंजाड, साहित्यिक विवेक उगलमुगले, प्रशांत वाघ, संदीप राक्षे, देवीदास तांबे, तानाजी वाघ, जनाबाई वाघ, मीराबाई वाघ, संदीप देसले, वैशाली वाघ आदी उपस्थित होते. डॉ. संदीप मराठे यांनी पुस्तकाचा नायक मराठी साहित्याला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवतो, असे सांगितले. दालनात निपेऱ्या या पुस्तकाने मोलाची भर घातली असून, पर्यावरण रक्षण व वृक्षप्रेमाचा संदेश देणारे हे पुस्तक मराठी वाचकांच्या घराघरांत पोहोचले पाहिजे, असे अप्पर कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी सांगितले. कवी किरण भावसार, गुणवंत कामगार गणेश तांबोळी, भरत मांडे, रवींद्र गिरी, नगरसेवक अनिल सरवार, सुनीता वाळुंज, प्रा. संजय पवार, सत्यजित कळवणकर, सोपान सानप आदी उपस्थित होते. प्रा. सुनीता सांगळे यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री वाघ यांनी आभार मानले. ........................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: पंतप्रधान आता नवीन स्वामी झालेत का? त्यांच्याकडे गद्दारांसाठी वेळ पण GenZ साठी नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात

Mumbai Local: रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक, प्रवाशांचा खोळंबा होणार; वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन

Kolhapur House fire in Rui : डोळ्यादेखत घरं जळून खाक, हातात काहीच उरलं नाही; पण गावाच्या एका आवाहनाने लाखोंची मदत उभी राहिली

Latest Marathi News Live Update : मुंबई गोवा महामार्गाच्या आढावा बैठकीत मंत्री आदिती तटकरे अधिकाऱ्यांवर खडे बोल

Jharkhand Protest Reason : 38 प्रश्न सोडवले, तरी सरकारी नोकरी, झारखंडमधील स्कॅम काय?

SCROLL FOR NEXT