महिलेची आत्महत्या
सिन्नर ः डुबेरे नाका येथील वेदांत पँराडाईज माधवबाग इमारतीत राहणाऱ्या पूजा अनुराम गोडे (वय २७) यांनी राहत्या घरात फॅनला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसपाटील अनिल डगळे यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, हवालदार राऊत तपास करत आहेत.