फोटो-21532
सिन्नर ः मंगळवारी झालेल्या पावसाने रस्त्यांवरून असे पाणी वाहत होते.
सिन्नरला दुसऱ्या दिवशीही पाऊस
सिन्नर ः लांबलेल्या पावसाने चांगली सुरुवात केल्यामुळे तालुक्यातील शेतकरी सुखावला आहे. शहर व तालुक्यात दुसऱ्या दिवशीही मंगळवारी (ता. २३) दिवसभर पाऊस सुरू होता. पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने शेतकऱ्यांच्या खरिपाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जून संपत आला तरी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणी पळाले होते. परंतु, सोमवारी (ता. २२) पावसाने दमदार हजेरी लावली. तर मंगळवारी (ता. २३) दुपारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील पूर्व व पश्चिम भागात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती.
वडांगळीत सर्वाधिक पाऊस
सोमवारी (ता. २३) वडांगळीत सर्वाधिक ५१ मिमी पाऊस झाला. नायगाव परिसरात पाऊसच झाला नाही. पांढुर्ली, सोनांबे, डुबेरे येथे सर्वाधिक कमी म्हणजे ०.३ मिमी पाऊस झाला. सिन्नरला १५.३, देवपूर येथे ३२.८, वावी ११.५, शहा १५.५, नांदूरशिंगोटेत ९, पांगरी बुद्रुकला ३२.८ तर गोंदे येथे ९ मिमी पाऊस पडला. तालुक्यात सरासरी १६.२ मिमी पाऊस झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.