नाशिक

खासदार वाजे यांचा सर्वपक्षियांतर्फे रविवारी होणार गौरव दंगलकार नितीन चंदनशिवे यांची व्याख्यानाची मेजवानी

CD
खासदार राजाभाऊ वाजे यांचा रविववारी सिन्नरला नागरी सत्कार सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २३ ः आपल्या ठाम भूमिकेमुळे चर्चेत आलेले खासदार राजाभाऊ वाजे यांचा रविवारी (ता. २८) दुपारी चारला ज्वालामाता लॉन्स येथे नागरी सत्कार सोहळा होणार आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात अध्यक्षस्थानी असतील. माजी आमदार विलास लोणारी यांच्या हस्ते नागरी सत्कार होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पडलेल्या फुटीनंतर नऊपैकी सहा खासदारांनी सत्ताधारी गटाची वाट धरली. या घडामोडीत खासदार वाजे यांच्यापुढे आलेल्या राजकीय प्रस्ताव आणि वाजे यांची ठाम भूमिका यामुळे देशभर चर्चा झाली. बदलत्या राजकीय समीकरणांच्या काळात स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांचे कौतुक झाले. याच पार्श्वभूमीवर सिन्नरमध्ये होणारा नागरी सत्कार हा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी तालुक्यातील विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, युवक मंडळे तसेच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. ............. चौकट नितीन चंदनशिवे यांचे व्याख्यान प्रसिद्ध कवी व वक्ते दंगलकार नितीन चंदनशिवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, या वेळी त्यांचे व्याख्यान होणार आहे. सामाजिक आणि राजकीय बदलांच्या पार्श्वभूमीवर निष्ठा, विचार आणि लोकप्रतिनिधींची जबाबदारी या विषयांवर ते बोलणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईची तुंबई, पहिल्याच पावसाने दैना; मध्य रेल्वेचा खोळंबा, ट्रान्स हार्बर ठप्प

Mumbai-Goa Highway : पहिल्याच पावसात महामार्गाची दैना! उक्षी फाट्याला तळ्याचं स्वरूप, 18 वर्षांच्या वनवासानंतरही त्रास कायम

Nirav Modi UK Court Verdict : नीरव मोदीला लंडन हायकोर्टाचा मोठा झटका; बँक ऑफ इंडियाचे १०० कोटींचे कर्ज फेडण्याचे आदेश

Pune Rain Update: मंगळवार रात्रीपासून पुणे भिजलं; अनेक रस्ते जलमय, 4 दिवस पावसाचा इशारा

Monsoon Forecast Maharashtra : महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यात ३ दिवस पावसाचा इशारा, अरबी समुद्रात मॉन्सूनला पोषक हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT