नाशिक

ज्ञानदामुळे सव्वाशे विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांचे गौरव सोहळ्यात प्रतिपादन

CD
फोटो ः 21543 सिन्नर ः ज्ञानदा करीअर अकॅडमीच्या विद्यार्थी गौरव सोहळ्यात सहभागी विद्यार्थ्यांसह रवींद्रकुमार बोरसे, उदय सांगळे, सिमंतीनी कोकाटे, ॲड. भगवान कर्पे, सुदाम शेळके आदी. -- ‘ज्ञानदा’मुळे सव्वाशे विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल पोलिस निरीक्षक बोरसे ः सिन्नर येथे गुणगौरव सोहळ्यात प्रतिपादन सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २४ : ज्ञानदा करिअर अकॅडमीने १२३ विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणला आहे. शासकीय नोकरीत यशस्वी प्रवेश घडवून या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांनी केले. -- येथील लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये झालेल्या विद्यार्थी गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ज्ञानदा करिअर अकॅडमीतून प्रशिक्षण घेतलेल्या ८७ युवक-युवतींना पोलिस भरतीत यश मिळाले तर ३५ युवकांना आर्मीत यशस्वी प्रवेश करता आला. या विद्यार्थ्यांचा गौरव यावेळी झाला. भाजप नेते उदय सांगळे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सिमंतनी कोकाटे, नगराध्यक्ष विठ्ठल उगले, सामाजिक कार्यकर्ते ॲड. भगवान कर्पे आदी यावेळी उपस्थित होते. अकॅडमीचे संस्थापक सुदाम शेळके यांनी स्वागत केले. निरीक्षक बोरसे म्हणाले की, योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर यशाला गवसणी घालता येते. नोकरीतही या यशाचा आलेख कायम ठेवावा. इतरांना आदर्श ठरेल असे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. उदय सांगळे यांनी अकॅडमीच्या यशाचे स्वागत केले. ग्रामीण भागात सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या या अकॅडमीने नेत्रदीपक यश मिळविले असल्याचे ते म्हणाले. नोकरीत तालुक्याचे नाव कायम उंच राहील असे काम करण्याचे आवाहन केले. सिमंतनी कोकाटे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या यशामागे ज्ञानदाकडून घेतली जात असलेली मेहनत महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या. संस्थापक सुदाम शेळके यांनी ज्ञानदा करिअर अकॅडमीच्या उपक्रमांची माहिती दिली. ज्ञानदाने कायम विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार केला असल्याचे सांगितले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT