नाशिक

गुळवंचला एकल महिलांसाठी बुधवार राखीव योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष उपक्रम

CD
फोटो ः 21547 गुळवंच ः एकल महिला दिनानिमित्त योजनांची माहिती देताना संजय गिरी. समवेत भाऊदास शिरसाट, नीता सानप आदी. -- गुळवंच ग्रामपंचायतीत रुढी-परंपरांना फाटा एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी गावाचा पुढाकार सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २४ : गुळवंच ग्रामपंचायतीत रुढी-परंपरांना बाजूला सारून एकल महिलांचा सन्मान करण्यात आला. एकल महिलांना शासकीय योजनांचा लाभ देण्याबरोबरच विविध कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी बुधवारचा दिवस ग्रामपंचायतीने राखीव ठेवला आहे. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांना बाजूला सारून एकल, विधवा, परितक्त्या आणि घटस्फोटीत महिलांना समाजात सन्मानाची वागणूक देणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा उद्देश असल्याची माहिती ग्रामपंचायत अधिकारी संजय गिरी यांनी दिली. कार्यक्रमात ५७ एकल महिलांनी सहभाग घेतला. गावातील एकल महिलांना विविध शासकीय दाखले व योजनांचा लाभ मिळण्यात महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठी ग्राम महसूल अधिकारी आकाश हांडे यांच्याशी थेट समन्वय साधून, महसूल विभागाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न ग्रामपंचायतीमार्फत केले जातील अशी ग्वाही गिरी यांनी दिली. यावेळी बालसंगोपन योजनेची माहिती देण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र मुलांना मिळणारा प्रति महिना २,२५० रुपयांचा लाभ गरजू एकल महिलांच्या पाल्यांना मिळवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. शीतल कळसकर, योगिता सातपुते यांनी संगणकीय व तांत्रिक कामात सक्रिय मदत करण्याची तयारी दर्शवली. कार्यक्रमास प्रशासक भाऊदास शिरसाठ, आदिशक्ती समितीच्या अध्यक्षा नीता सानप, समुदाय आरोग्य अधिकारी घोटेकर, आरोग्य सेवक संदीप जायभावे, मुख्याध्यापिका मंगला पवार, रत्ना गोळेसर, आशा सुनीता झूटिंग, कविता शिरसाट, शीतल पळसकर आदी उपस्थित होते. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

‘गव्हर्नर माझ्यासाठी...’ मनोज बाजपेयींसोबतच्या अनुभवावर चिन्मय मांडलेकरची खास पोस्ट; फोटो व्हायरल!

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

Mumbai: कायदाच अस्तित्वात नाही, तरी कारवाई का? कोर्टानं राज्य सरकारला ठोठावला दंड

IPL 2027: रिषभ पंतने LSG संघानं ट्रेड केल्यानंतर लिहिला फक्त तीन शब्दांचा मेसेज! पाहा काय केली पोस्ट

SCROLL FOR NEXT