नाशिक

दहशत माजविणाऱ्याची पोलिसांनी काढली धिंड

CD
फोटो ः 21559 सिन्नर ः दहशत माजविणाऱ्या कोयताविराची पोलिसांनी काढलेली धिंड. -- दहशत माजविणाऱ्याची पोलिसांनी काढली धिंड सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २४ : येथील बस स्थानकावर हातात कोयता घेऊन दहशत पसरविणाऱ्या एका संशयिताला सिन्नर पोलिसांनी अटक करून त्याची भरबाजारात धिंड काढली. ज्या ठिकाणी त्याने दहशत माजवली होती, त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याच्याकडून ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ असे जाहीरपणे वदवून घेतले. आकाश देविदास गोळेसर (वय २६, रा. भोईगल्ली, गावठा, सिन्नर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने मंगळवारी (ता. २३) दुपारी दीडच्या सुमारास बस स्थानकात हातात कोयता घेऊन धुमाकूळ घातला होता. त्याने सिटीलिंक बसच्या काचेवर कोयता मारून नुकसान केले, चालकाला दुखापत करण्याचा प्रयत्न केला, प्रवाशांना शिवीगाळ केली आणि उपस्थित अधिकाऱ्यांना धमकावले. एवढेच नव्हे तर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांशीही हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला. पोलिस निरीक्षक संदीपकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन डावखर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे व नवनाथ पवार यांच्या पथकाने त्याला तातडीने ताब्यात घेत त्याच्याकडील कोयता हस्तगत केला आणि त्याची परिसरात धिंड काढत गुंडगिरी मोडून काढली. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांनो लक्ष द्या! Meesho वरून खरेदी करता? तर आधी 'ही' बातमी नक्की वाचा; हायकोर्टाचा मोठा निर्णय

Video: "मला नरेंद्र नावाचा तिरस्कार...", PM मोदींना भारतीय बॉक्सरने सांगितलेला पाकिस्तानी खेळाडूचा किस्सा ऐकून आवरेना हसू

Marathi News Live Updates : भाजप आमदाराला गोळ्या घाल, पैसे देतो; दोघांनी ड्रायव्हरला दिली ऑफर, सोलापुरात गुन्हा दाखल

Sugar Price: राज्यात साखरेचा तुटवडा, सणासुदीत भाव आणखी भडकण्याची शक्यता, किलोमागे किती मोजावे लागणार?

Samruddhi Mahamarg News: महामार्गावर नेमकं काय घडलं? RTO अधिकाऱ्यांनी केला मोठा खुलासा; म्हणाले, ''ट्रक चालकाने...''

SCROLL FOR NEXT