शिवाजीनगरातील उद्यानाला
‘जिजाऊं’चे नाव देण्याची मागणी
सिन्नर, ता. २५ : छत्रपती शिवाजीनगर येथील खुळ्या भूखंडातील उद्यानाचे "वीर माता जिजाबाई उद्यान" असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत नगराध्यक्ष विठ्ठल उगले, मुख्याधिकारी अभिजित कदम यांना निवेदन देण्यात आले. परिसरातील मुळ प्लाॅट धारकांनी ही मागणी केली आहे. वीर माता जिजाबाई यांच्या कार्याची व छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यातील त्यांच्या योगदानाची महती विचारात घेता त्यांच्या नावाने उद्यानाचे नामकरण केल्यास परिसरातील नागरिक व भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. एकनाथ तांबे, एकनाथ चव्हाण, मंगेश शिंपी, योगेश थोरात, अमोल गडाख, किरण चव्हाण, प्रमोद उगले, अनिल थोरात, परेश मुंदडा, किशोर देशमुख आदींनी याबाबत निवेदन दिले. नगराध्यक्ष उगले यांनी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.