नाशिक

माळेगाव वसाहतीसाठी स्वतंत्र वाहन, लवकरच पोलिस चौकी पोलिस निरीक्षक भरत जाधव यांची सिमाच्या बैठकीत माहिती

CD
पान तीन ------------------ 21572 सिन्नर : माळेगाव औद्योगिक वसाहतीत सिमाच्या बैठकीत उद्योजकांच्या समस्येवर चर्चा करताना भरत जाधव. समवेत सुकुमार नायर, बबन वाजे, सुनीता फाल्गुने. माळेगाव औद्योगिक वसाहतीत पोलिस चौकी पोलिस निरीक्षक भरत जाधव यांची ''सिमा''च्या बैठकीत ग्वाही सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. २६ : माळेगाव औद्योगिक वसाहतीसाठी आता स्वतंत्र पोलिस वाहन उपलब्ध करून देण्यात आले असून, जिंदाल कारखान्याच्या सहकार्यातून येथे लवकरच नवीन पोलिस चौकी उभारण्यात येणार आहे. या चौकीमध्ये २४ तास पोलिस मनुष्यबळ तैनात केले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी दिली. ''सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन'' (सिमा) वतीने आयोजित उद्योजकांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते. ''सिमा''चे अध्यक्ष सुकुमार नायर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षा सुनीता फाल्गुने, ''सिमा''चे सचिव बबन वाजे आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला ''सिमा''चे सचिव बबन वाजे यांनी औद्योगिक वसाहतीतील सुरक्षाविषयक गंभीर प्रश्न उपस्थित केले. यामध्ये वसाहतीमध्ये वाढलेल्या चोरीच्या घटना आणि कामगारांच्या पगाराच्या दिवशी होणारी लुटमार, रस्त्याने जाणाऱ्या कामगारांचे मोबाईल पळवणाऱ्या चोरांचा वाढलेला सुळसुळाट, वसाहत परिसरात होणारी गांजा व अवैध दारूची सर्रास विक्री. विविध कारणांसाठी उद्योजकांना वर्गणीसाठी दिला जाणारा त्रास या तक्रारी मांडण्यात आल्या. उद्योजकांच्या तक्रारींची दखल घेत पोलिस निरीक्षक भरत जाधव यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगत अवैध धंद्यांना खतपाणी घालणाऱ्या परिसरातील अनधिकृत टपऱ्यांवर तातडीने कारवाई केली जाईल. चोरट्यांच्या टोळ्या व अवैध व्यवसायांचे पूर्णपणे उच्चाटन करण्यात येईल. माळेगाव वसाहतीप्रमाणेच मुसळगाव औद्योगिक वसाहतीमधील समस्यांचीही अशाच पद्धतीने दखल घेऊन तिथेही सुरक्षा वाढवली जाईल. उद्योजकांनी आपल्या कारखाना परिसरासोबतच बाहेरील रस्तेही कव्हर होतील, अशा पद्धतीने सीसीटीव्ही बसवून प्रशासनाला सहकार्य करावे. असेही आवाहन केले. याशिवाय कोणत्याही व्यक्तीकडून त्रास होत असल्यास किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास उद्योजकांनी थेट पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा किंवा ''११२'' या क्रमांकावर त्वरित कॉल करावा असे आवाहन केले. बैठकीला ''सिमा''चे उपाध्यक्ष विठ्ठल जपे, विश्वस्त मारुती कुलकर्णी, कोषाध्यक्ष राहुल नवले, अरुण चव्हाणके, सुधीर जोशी, मुकेश देशमुख, सतीश नेहे, प्रमोद कुटे, अरुण खालकर, शांताराम दारुंटे, शशिकांत नवले, शरद टर्ले यांच्यासह ''निमा''चे सुधीर बडगुजर, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष संतोष मंडलेचा आणि वसाहतीतील उद्योजक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I : श्रेयस अय्यरच्या नावावर नकोसा विक्रम; टीम इंडियाचीही झाली नाचक्की... भारताला हरवणारा आयर्लंड ११ वा संघ...

IND vs IRE 1st T20I: भारतीय संघ का हरला? ११ सामन्यांची अपराजित मालिका खंडित; कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणतो ते वाचा...

Indian Navy selection: पंढरपूरचा सूर्यन मुकणे भारतीय नौदलात सब लेफ्टनंट; माढा-पंढरपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Illegal Sand Mining Action: आमदार प्रशांत बंब यांची अवैध वाळू उत्खननावर धडक कारवाई; दोन अवजड वाहने जप्त

हवाई प्रवास होणार महाग? एअरलाइन्स आर्थिक संकटात; ICRA चा मोठा इशारा, प्रवाशांना बसू शकतो फटका

SCROLL FOR NEXT