21584
सिन्नर : नियम डावलणाऱ्या दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिस.
बेशिस्त वाहनचालकांकडून
लाखाचा दंड वसुल; ११ दुचाकी ताब्यात
सकाळ वृतसेवा
सिन्नर, ता. २६ : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी दोन दिवसात ११ दुचाकी ताब्यात घेतल्या. तसेच ६० दुचाकीस्वाराकडून एक लाखाचा दंड आकारण्यात आला आहे.
शहरातील मुख्य गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून कारवाईला सुरुवात झाली. गणेश पेठ, नेहरू चौक, गावठा, बस स्थानक या परिसरात ही कारवाई करण्यात आली. या अगोदर सिन्नर पोलिस ठाण्याच्यावतीने सायलेन्समध्ये बदल करून कर्णकर्कश व फटाका आवाज काढणारे सायलेन्स असलेल्या ३७ बुलेट पोलिसांनी ताब्यात घेतल्या घेत त्यांच्याकडून ३५ हजाराचा दंड वसुल करण्यासह सायलेन्सरवर बुलडोझर चालविण्याची कारवाई केली होती.
त्यानंतर पोलिसांनी पुन्हा केलेल्या कारवाईत वाहनांना नंबर प्लेट नसणे, नंबर प्लेट चुकीची असणे, तुटलेले नंबर प्लेट, फॅन्सी नंबर असणे, दुचाकीवर तीन प्रवासी असणे, वेगाने दुचाकी चालविणे, रस्त्यात दुचाकी उभी करणे, वाहतुकीला अडथळा होईल असे दुचाकी उभी करणे आदी प्रकारचे नियम मोडणाऱ्या दुचाकी चालकांवर ही कारवाई करण्यात आली आहे.
यात गुरुवारी (ता.२५) ३९ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७६ हजार ५०० रुपयांचा ऑनलाइन दंड वसुल केला. शुक्रवारी (ता. २६) झालेल्या कारवाईत २१ दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २५ हजार रुपयांचा ऑनलाइन दंड वसुल करण्यात आला. तर ११ दुचाकी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आल्या.
पोलिस निरीक्षक रवींद्रकुमार बोरसे यांच्यासह वाहतूक विभागाचे हवालदार रवींद्र चिने, हवालदार नितीन डावखर, भारत पवार, विलास बिडगर यांच्यासह दंगा नियंत्रण पथकाचे जवान कारवाई मोहिमेत सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.