SNR26B22557
डुबेरे ः श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेच्या वार्षिक सभेत बोलताना नारायण वाजे. व्यासपीठावर अरुण वारुंगसे, शंकर वामने, काशिनाथ वाजे, आनंदा सहाणे, प्रा. एकनाथ माळी आदी.
---------------
३०-२
थोरले बाजीराव पतसंस्थेतर्फे
दहा टक्के लाभांशाची घोषणा
---------------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.२ ः श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष नारायण वाजे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेत लाभांश वाटपासह संस्था विस्तार, आधुनिकीकरणात भर यासह विविध विषयांवर चर्चा झाली. अध्यक्ष वाजे यांनी सभासदांना १० टक्के लाभांश जाहीर केला.
----------
खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह व्यासपीठावर पुणे राज्य सहकारी संघाचे माजी कार्यकारी अधिकारी हरिभाऊ वाकचौरे, उपाध्यक्ष अरुणशेठ वारुंगसे, जनसंपर्क संचालक शकराराव वामने, काशिनाथ वाजे, आनंदा सहाणे, प्रा एकनाथ माळी, गणेश वाजे, गोरख ढोली, विष्णू भालेराव, पोपट रहाटळ, म्हसु पवार, मीराबाई कुरणे, संगीता वाजे, ॲड. प्रदीप वारुंगसे, दामोदर कुंदे, कार्यकारी अधिकारी महेश कुटे आदी उपस्थित होते.
संस्थेतर्फे एकूण ७७ लाख ९६ हजार ५७६ रुपयांचे लाभांशाचे वितरण सभा सुरु असतानाच बॅंक खात्यात करण्यात आले. त्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करण्यात आले. वाजे यांनी संस्थेचा लेखाजोखा मांडला. सतत ३४ वर्षे ‘अ’ आँडीट वर्ग मिळाल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेकडे २७४ कोटीच्या ठेवी, २१६ कोटीचे कर्ज वितरण, ८९ कोटीची गुंतवणूक असल्याचे सांगितले. २५ हजार ५७५ इतकी सभासद संख्या असल्याची माहिती दिली. संस्थेने अँप, आयएफएससी, क्युआर कोरड, ईसीएस आरटीजीएस, एनईएफटी या सुविधा दिल्या असून डुबेरे, पांढुर्ली, वडांगळी, समशेरपूर येथे एटीएम सुविधा दिली असल्याचे सांगितले. संस्थेच्या दहा शाखा असून ७५ कर्मचारी तसेच ११२ प्रतिनिधी कार्यरत असल्याचे ते म्हणाले.
-------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.