सिन्नरमधील पाणीपुरवठ्याचे सर्वेक्षण होणार
-------------
सल्लागार संस्थेची नियुक्ती ः पाण्याचा दाब, वाढती गरज, गळती आदींचा माहिती घेणार
-------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.३ ः शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जुन्या जलवाहिन्या, पाण्याचा मिळणारा दाब, गळती, जलवाहिनी टाकण्याची गरज आदी मुद्दे या सर्वेक्षणात विचारात घेतले जाणार आहेत. त्यासाठी एका सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे.
नगराध्यक्ष विठ्ठल उगले यांच्या अध्यक्षतेखाली पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत बैठक पार पडली. मुख्याधिकारी अभिजीत कदम, पाणीपुरवठा अभियंता प्रशांत मेश्राम, आरोग्य सभापती ललिता दत्ता हांडे, नगरसेवक अजय गोजरे, अनिल सरवार, ज्योती पंकज मोरे, आशिष गोळेसर, कमळाबाई पगार, कांताबाई जाधव, योगिता वरंदळ, सुवर्णा उबाळे, मनीषा गवळी, लक्ष्मीताई पवार, सविता खोळंबे, अमोल झगडे, निशा बोडके, आशा कर्पे आदी उपस्थित होते.
------------
बैठकीत पीएमसी ‘ॲकम व्हेंचर्स’ या सल्लागार संस्थेला शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नवीन जलवाहिनी टाकण्याची आवश्यकता, जुन्या पीव्हीसी जलवाहिनीची सद्यस्थिती तपासणे, आवश्यक त्या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आदी सूचना संस्थेला देण्यात आल्या. प्रत्येक नागरिकाला समान व पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले पाहिजे. त्यासाठी संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करून पाणीपुरवठ्यातील त्रुटी, जुन्या लाईन, नवीन जलवाहिनीची आवश्यकता आणि पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी करावयाच्या कामांचा सविस्तर अहवाल नगरपरिषदेला सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यानुसार आवश्यक कामांना प्राधान्य देऊन नियोजन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
१६-१
पुरवठ्यातील त्रुटी होणार दूर
काही भागात कमी दाबाने काही भागात कमी प्रमाणात पाणी येते. या सर्वेक्षणामुळे या त्रुटीही दूर होण्यास मदत होणार आहे. पाणीपुरवठा योजनेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रथमच नगरपरिषदेने एका सल्लागार संस्थेची नेमणूक केली आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता त्याचाही विचार या सर्वेक्षणात होणार आहे.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.