फोटो-22596
शहा ः भैरवनाथ हायस्कूलचा हिरवाईने नटलेला परिसर.
शहातील शिक्षकांनी केली
खडकाळ जमीन हिरवीगार
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. ६ ः शहा येथील भैरवनाथ हायस्कूलमधील शिक्षकांनी दोन दशकांत खडकाळ व उंच-सखल असलेला सहा एकर परिसर ८५० हून अधिक वृक्षांनी हिरवागार केला आहे. या हिरवाईने परिसर लक्षवेधी बनला आहे.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत श्रमदानातून टेकड्या सपाट करून खडक फोडून वृक्षांसाठी खड्डे तयार केले. २० वर्षांत विद्यालय परिसरात तीन हजारांहून अधिक वृक्षांची लागवड केली. निंब, वड, पिंपळ, चिंच यांसह विविध देशी वृक्षांची लागवड व संगोपन आजही सुरूच आहे. विद्यालयात पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांनी एक किलोमीटरवरून पाणी आणून रोपांची निगा राखली. सध्या ८५० हून अधिक मोठी झाडे परिसरात दिसत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख, उपाध्यक्ष दौलतराव मोगल, ज्येष्ठ संचालक विजय गडाख, कार्यकारी संचालक अभिषेक गडाख आदींच्या संकल्पनेतून शहा, कारवाडी, रामपूर, मीरगाव व विघ्नवाडी येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वृक्षलागवड उपक्रम राबविला जात आहे.
विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक व क्रीडा सुविधांची गरज आहे. ज्ञानदानासोबत पर्यावरण संवर्धन करणाऱ्या या विद्यालयाला लोकप्रतिनिधी, उद्योजक, सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे मत प्राचार्य माधव शिंदे यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी शिक्षक केवळ शिकवत नाही तर पुढची पुढी घडवत असल्याचे सांगितले.
...........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.