नाशिक

डीएमआयसीच्या दुसऱ्या टप्प्यात सिन्नरचा समावेश करा सिमाची उद्योग मंत्र्यांकडे मागणी

CD
पान-२ सेकंडमेन करावा--उद्योगाचे चित्र वापरावे सिंगल -------------- ‘डीएमआयसी’मध्ये सिन्नरचा समावेश करावा सीमाची उद्योग मंत्र्यांकडे मागणी ः अनेक अडचणी आता दूर, दशकभरात औद्योगिक स्थितीत आमूलाग्र बदल ------------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.७ ः दिल्ली- मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या (डीएमआयसी) दुसऱ्या टप्प्यात सिन्नरचा समावेश करावा, अशी मागणी सिन्नर इंडस्ट्रीअल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (सीमा) तर्फे करण्यात आली आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत, केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांना ई-मेलद्वारेही पत्र दिले आहे. ------------- अध्यक्ष सुकुमार नायर, उपाध्यक्ष किरण भंडारी व विठ्ठल जपे, सचिव बबन वाजे, खजिनदार राहुल नवले, रतन पडवळ, मारुती कुलकर्णी, किशोर राठी, अरुण चव्हाणके, मुकेश देशमुख, अरुण खालकर, सुधीर जोशी, सारंग कुलकर्णी, नवनाथ नागरे, दत्ता नवले, शांताराम दारुंटे, शरद टरले, शशिकांत नवले, प्रमोद कुटे, नीलेश सोनवणे आदी पदाधिकारी व उद्योजकांनी केली आहे. पहिल्या टप्प्याच्या नियोजनावेळी सिन्नर- नाशिक परिसराचा समावेश होण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यावेळी उद्योगांसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता व आरक्षणाबाबत अडचणी असल्याचे कारण पुढे आल्याने नाशिकचा पहिल्या टप्प्यात समावेश होऊ शकला नाही. परिणामी, छत्रपती संभाजीनगर येथील सेंद्रा- बिडकीन परिसराचा औद्योगिक केंद्र म्हणून विकास करण्यात आला. गेल्या दशकभरात सिन्नरच्या औद्योगिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला आहे. सिन्नर हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे आणि वेगाने विकसित होणारे औद्योगिक केंद्र बनले असल्याचे सीमाचे सचिव बबन वाजे यांनी म्हटले आहे. सिन्नरचा समावेश झाल्यास या उद्योगांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आधुनिक लॉजिस्टिक्स आणि देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी अधिक प्रभावी जोडणी मिळू शकते, असे अध्यक्ष सुकुमार नायर यांनी म्हटले आहे. १६-१ पायाभूत सुविधांचा आधार सिन्नरला समृद्धी महामार्ग, मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे तसेच नाशिक विमानतळाची सुविधा उपलब्ध आहे. प्रस्तावित सुरत- चेन्नई इकॉनॉमिक कॉरिडॉरमुळे सिन्नर व नाशिकचे औद्योगिक महत्त्व आणखी वाढणार आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट व दिघी बंदराशी असलेली जवळीक निर्यात आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने सिन्नरला मोठा फायदा मिळवून देणारी आहे. १६-१ शेतकऱ्यांनाही फायदा ‘डीएमआयसी’मुळे सिन्नरला कोल्ड स्टोरेज, फूड प्रोसेसिंग, कृषी प्रक्रिया आणि निर्यातक्षम उद्योगांना चालना मिळू शकते, असे उपाध्यक्ष किरण भंडारी यांनी सांगितले. गारगाई- देव नदीजोड प्रकल्पातील पाण्याचे औद्योगिक नियोजन करण्याची मागणी ‘सीमा’चे विश्वस्त मारुती कुलकर्णी यांनी केली आहे. सिन्नरचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावा, अशी मागणी सीमाचे पदाधिकारी मुकेश देशमुख यांनी केली आहे. -------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

Marathi News Live Updates: तळेगाव ढमढेरे परिसरात विजेमुळे ग्रामस्थ त्रस्त

आई म्हणाली ‘चॉकलेट बंद कर’; स्क्वॉशपटू अनाहतने थेट न्यूट्रिशनिस्टलाच फोन केला! नेमकं काय घडलं? Viral Video

SCROLL FOR NEXT