नाशिक

गोदा युनियनचे संचालक मंडळ बरखास्त

CD
‘गोदा युनियन’चे संचालक मंडळ बरखास्त ------------ कारभारात अनियमितततेमुळे कारवाई ः प्रशासकाची नियुक्ती ----------- सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता.७ ः नायगाव येथील गोदा युनियन कृषक सहकारी संस्थेचे संचालक मंडळ सहकार विभागाने बरखास्त केले आहे. त्याचबरोबर प्रशासकाचीही नेमणूक करण्यात आली आहे. मंडळाच्या कारभारात अनियमितता असल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सहाय्यक निबंधक संजय गिते यांनी दिली. संस्थेचे दहा संचालकांचे मंडळ बरखास्त करण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून संचालक मंडळाच्या कारभाराविरोधात सहकार विभागाकडे तक्रारी आल्या होत्या. सभासदांच्या तक्रारीनंतर सहकार विभागाने चौकशीही केली. संचालक मंडळातही अंतर्गत मतभेद उफाळून आले होते. गेल्या तीन- चार वर्षांपासून प्रभावीपणे काम झाले नसल्याचे सहकार विभागाच्या चौकशीत निदर्शनास आले. संस्थेचे जवळपास ९० टक्के कर्ज थकीत असल्याचे सहाय्यक निबंधक गिते यांनी सांगितले. महिनाभरापूर्वी संस्थेचे अध्यक्षांसह तीन संचालकांवर कारवाई झाली होती. उर्वरित संचालकांना म्हणणे मांडण्यासाठी सहकार विभागाने तीन वेळा संधी दिली. समाधानकारक खुलासा करण्यात आला नसल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे गिते यांनी सांगितले. सहकारी संस्था अधिनियम आणि संस्थेच्या पोटनियमांनुसार कारभार न झाल्याचे तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. संचालकांनी मनमानी व नियमबाह्य पद्धतीने कारभार केल्याचे कारवाईत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant: देशाच्या सरन्यायाधीशांनी घेतली बीडच्या रमाबाईंची दखल; लेकीच्या शिक्षणासाठी धावणाऱ्या महिलेला भरीव मदत

Ketu Transit Lucky Zodiac Signs: ‘या’ ६ राशींच्या नशिबात येणार मोठा ट्विस्ट; केतूच्या गोचराने मिळणार धनलाभाची संधी, पाहा तुमची रास आहे का?

Marathi News Live Updates: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Pune News : विनापरवाना लावणीचा कार्यक्रम; मंडळाच्या अध्यक्षांसह नृत्यांगना राधा पाटील यांच्यावर गुन्हा दाखल

Social Media: 'Likes' मुळे वाढतोय मानसिक ताण? Post's च्या मोहात अडकतात डिप्रेशनग्रस्त लोक; संशोधनातून धक्कादायक खुलासा!

SCROLL FOR NEXT