नाशिक

३९ दिवसापासून ४९ महसूल मंडळे कोरडी अल्प पावसाने पिकांना ओढ, आँगस्टला अवघा ४७ टक्के पाऊस

CD
पान तीन मेन -------------------- 22649 सिन्नर : पावसाने ओढ दिल्याने पूर्व भागात सुकू लागलेली पिके. ---------- जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळे कोरडी अल्प पावसाने पिकांना ओढ ; ऑगस्टमध्ये ४७ टक्के पाऊस संपत ढोली : सकाळ वृत्तसेवा सिन्नर, ता. ९ : नाशिक जिल्ह्यात ऑगस्टपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळात कमीत कमी २२ ते जास्तीत जास्त ३९ दिवसापासून पावसाने दडी मारली आहे तर १३ महसूल मंडळात पावसाचा सर्वाधिक खंड पडला असल्याने हाताशी आलेले पीक आता वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. अनियमित पावसाचा फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसणार असल्याने बळीराजा चिंतेत आहेत. विशेषतः पावसाच्या खंड पडल्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसणार आहे. ऐन फुलोऱ्यातील पिके सुकू लागल्याने पिके जगवावी कशी ? असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांपुढे आहे. विहिरीचीही भूजल पातळी फारशी सुधारलेली नाही. अल्प पाणी असले तरी खंडीत वीज पुरवठ्याला सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. --------- येवला, सिन्नर तालुका सर्वाधिक अडचणीत येवला तालुक्यातील नगरसुल, पाटोदा, जळगाव या महसूल मंडळात ३९ तर सावरगाव, अंगणगाव, राजापूर, अंदरसुल येथे ३६ दिवसापासून पावसाळा कोरडा आहे. त्याखालोखाल सिन्नरचे सर्व ८ महसूल मंडळे धोकादायक स्थितीत आहेत. याच तालुक्यात पावसाने सर्वाधिक ओढ दिली आहे. -------- उत्पादन घटण्याची चिन्हे तब्बल ३९ दिवस पाऊस लांबल्याने ऐन फुलोऱ्यात असलेली सोयाबीनचे पीक अडचणीत आले आहे. कमी ओलाव्यामुळे झाडांची वाढ खुंटणे, फुले व शेंगा सुकणे यामुळे उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होवू शकेल. मका, बाजरी आदी खरीप पिकांचीही स्थिती यापेक्षा वेगळी नाही. ---------- गेल्या महिन्यात ४७ टक्के पाऊस जूनमध्ये वाट पाहण्यास लावणाऱ्या पावसाने जुलैमध्ये दमदार आगमन केले. नाशिक जिल्ह्यातील जुलैच्या ३०८.९ सरासरीच्या तुलनेत ४२१.९ मिमी म्हणजेच १३६ टक्के पाऊस पडला. त्यामुळे चांगला दिलासा मिळाला. पाऊस केव्हा उघडेल अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र ऑगस्टमध्ये २६६.९ मिमीच्या तुलनेत केवळ १२६.८ मिमी पाऊस पडला. केवळ ४७.५ टक्के पाऊस पडल्यामुळे सरासरी घसरली तर सप्टेंबरच्या नऊ दिवसात सरासरीच्या तुलनेत ३१.४ टक्के पाऊस पडला आहे. नाशिक जिल्ह्याची स्थिती जून ते सप्टेंबरची एकूण सरासरी : ८०५.३ मिमी जून ते ९ सप्टेंबरपर्यंतचा एकूण पाऊस : ६१९.२ मिमी तालुकानिहाय पावसाची ओढ असलेले महसूल मंडळे मालेगाव ७ कळवण ३ नांदगाव ७ नाशिक ३ सिन्नर ८ येवला ८ चांदवड ४ देवळा ३ बागलाण ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT